२९ जुलैला रमजान ईद निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. तशीच मुंबईच्या महापालिकेला सुद्धा सुट्टी होती. परंतू दैनिक "सकाळ" ने "ऍसिड विकत घेणाऱ्यांची नोंदणी हवी" या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमी मध्ये "ऍसिड हल्ल्यांना आळा घालायचा असल्यास ते विकत घेणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी होणे बंधनकारक करण्याचा ठराव मंगळवारी (ता.29) महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आला" असे म्हटले आहे. यामुळे सकाळच्या पत्रकाराने सर्वाना ईदची सुट्टी असताना पालिका सभागृहामध्ये ठराव मांडला अशी बातमी कशी दिली ? बातमी देणारा हा पत्रकार शुद्धीवर होता का ? बातमी तपासून लावणारे उपसंपादक झोपेत होते का? त्यांना २९ जुलैला ईद ची सुट्टी होती हे माहित नव्हते का ? असे कित्तेक प्रश्न वाचकांकडून उपस्थित केले जात आहेत.
Wednesday, 30 July 2014
भाजपही ‘सामना’ सारखे वृत्तपत्र काढणार
भोपाळ - शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’ या वृत्तपत्राप्रमाणे मध्य प्रदेश भाजप वर्तमानपत्र सुरू करणार अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतीच केली. रविवारी रात्री चौहान यांनी भाजप पदाधिकारी, प्रवक्ते आणि भाजप अंगीकृत संस्थांच्या प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ‘सामना’ जसे ठोस विचारांवर आधारलेले वर्तमानपत्र आहे, तसेच वर्तमानपत्र पक्ष सुरू करेल असे सांगितले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि सरकारची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचण्यास मदत होईल. राज्यातील दहा लाख कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांना जोडण्याचे काम हे वर्तमानपत्र करेल, असेही चौहान म्हणाले.
Monday, 28 July 2014
ब्ल्याकमेलर पत्रकारांमुळे पत्रकार व अधिकारी त्रस्त
मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागात येणाऱ्या शिवाजीनगर बैगन वाडी, गोवंडी परिसरात ९० टक्के ब्ल्याकमेलर पत्रकार आहेत. या पत्रकारांच्या ब्ल्याकमेलिंग मुळे स्वच्छ प्रतिमेच्या पत्रकारांना सुद्धा वृत्तसंकलन करताना त्रासाला सामोरे जावे लागत असून पालिकेचे अधिकारी सुद्धा या ब्ल्याकमेलर पत्रकारांपासून त्रस्त झाले आहेत.
प्रकाश अकोलकर प्रेस क्लबचे अध्यक्ष
मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रकाश अकोलकर यांची तर चेअरमनपदी गुरबीर सिंह यांची निवड झाली आहे. प्रेस क्लबच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीमध्ये राजेश मस्करेन्हास यांची सचिवपदी तर कुमार केतकर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे. अभिजीत साठे आणि मृत्युंजय बोस यांची क्रमश: संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर संतोष आंधळे, संतोष बने, प्रीती सोमपुरा, धर्मेन्द्र झोरे, ओमप्रकाश तिवारी, अयाझ मेमन, आशीष राजे, अजित जोशी, सुधाकर कश्यप आणि अनाहिता मुखर्जी यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.
Friday, 25 July 2014
महिला पत्रकाराचा रहस्यमय मृत्यू
उत्तरप्रदेश / गाजियाबाद - वैशाली नगर, सेक्टर ५ मध्ये मिलिता दत्ता मंडल या महिला टीव्ही प्रोड्यूसरचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. हि टीव्ही पत्रकार महागून सोसायटी मध्ये आपल्या पती सोबत राहत होती. ती दिल्ली येथील एका सरकारी च्यानल साठी काम करत होती. २१ जुलैला ती रात्री ११ वाजता घरी पोहोचली होती. आपल्या घरातील बाल्कनी मध्ये उभी असताना ती अचानक बाल्कनी मधून खाली पडली. तिच्या पतीने तिला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक पोलिस हि हत्या आहे कि आत्महत्या याचा तपास करत आहेत.
Thursday, 24 July 2014
दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला मदतीसाठी पत्रकारांचा मदतीचा हात
कोकणातील रत्नागिरी येथील जेष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत यांचे निधन झाले आहे. सावंत यांनी अगदी निष्ठेने पत्रकारिता केली आहे. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेलीच राहून त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. मात्र कोकणातील पत्रकारांनी सावंत यांच्या पाठीशी उभे राहत मदतीचा हात पुढे केला आहे. कित्तेक पत्रकारांनी आप आपल्या ऐपती प्रमाणे सावंत यांच्या कुटुंबीयांनी मदत केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांना इतर राज्या प्रमाणे पेन्शन योजना लागू नाही. पत्रकारांना त्यांचे मालक चांगला पगार देतात अशी परिस्थितीही नाही असे असताना कोकणातील पत्रकारांनी दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियाला जो मदतीचा हात दिला आहे त्या सर्व पत्रकारांना बेरक्याचा सलाम.
Tuesday, 22 July 2014
पत्रकार मंगेश सोनावणे यांना पितृशोक
पत्रकार मंगेश सोनावणे यांचे पिता लोकशाहीर सीताराम बाबू सोनावणे यांचे रविवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. बॉम्बे एस. पी. सी. ए. मध्ये निरीक्षक पदावरून नवृत्त झाल्यानंतर बहुजन हितवर्धक कला संस्था, बहुजन कलावंत महामंचाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दमदार आवाजातील गायिकीतून आंबेडकरी चळवळ घराघरात पोहोचविण्याचे महान कार्य सोनावणे यांच्याकडून अविरतपणे सुरू होते. त्यांच्या मृत्यूने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले आहे. रविवार, ३ ऑगस्ट २0१४ रोजी सकाळी ९.00 वाजता खार पूर्व न्यू आंबेवाडी येथील विश्वशांती बुद्धविहारात त्यांचा जलदान विधी आणि शोकसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार मंगेश सोनावणे यांनी दिली.
आऊटलूकविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी कोणत्याही मांत्रिकाची किंवा प्लँचेटची मदत घेतली नाही, असा दावा पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केला. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संबंधीचं वृत्त देणाऱ्या आऊटलूक या नियतकालिकाविरोधात आपण अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. आशिष खेतान यांच्याशी आपली भेट झाली होती. पण त्या भेटीमध्ये आपण अशी कोणताही माहिती त्यांना दिली नाही, असंही स्पष्टीकरण पोळ यांनी दिलं. त्यामुळे खेतान यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविल्याचंही पोळ यांनी सांगितलं.
Sunday, 20 July 2014
बेरक्याची दखल = अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास मिळण्यास सुरुवात
महाराष्ट्र राज्यातील अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास मिळत नसल्याने कित्तेक पत्रकार नाराज होते. याबाबत बेरक्यावर सतत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने बातम्यांची दखल घेवून बस पास मिळण्यासाठी लागणारी अधिस्वीकृत पत्रकारांची यादी संचालक माहिती व जनसंपर्क यांच्यामागे लागून बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना पाठवायला लावली आहे. युनियनने सदर यादी संचालकांना बेस्ट कडे पाठवायला भाग पाडल्याने आता अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पत्रकारितेची 'दुसरी बाजू'..

पत्रकाराने एखाद्या राजकीय नेत्याकडे अथवा पक्षासाठी काम करण्याची संकल्पना गेल्या दशकात विशेषत्वाने पुढे आली. काही इंग्रजी वर्तमानपत्रांच्या तसेच मराठीमधीलही काही पत्रकारांनी नोकरी सोडून 'राजकीय पीआर' करण्यास सुरुवात केली. तर ज्यांच्याकडे चांगली लेखनक्षमता तसेच उत्तम संभाषण कला, माध्यमसृष्टीशी उत्तम संपर्क आणि मार्केटिंगची तंत्रे अवगत होती, त्यांनी थेट कॉर्पोरेट प्रसारमाध्यम कंपन्यांमध्ये मोठय़ा पगाराच्या नोकऱ्या स्वीकारल्या.
बातम्या लावल्या म्हणून पत्रकारावर गोळ्या झाडल्या
पंजाब मलोट (गोयल) : स्थानिक वृत्तपत्रात एक बातमी लावल्याने पत्रकार शाम जुनेजा व वैद्य गुरबचन सिंग यांच्या मध्ये भांडण होऊन सिंग याने पत्रकारावर गोळ्या चालवल्याने पत्रकाराला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ - उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले चुकीचे आहेत असे म्हटले आहे. दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर पत्रकार संरक्षण कायद्याबाबतचा आपण मुंबईस गेल्यावर तातडीने मुख्यमंत्र्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा घडवून आणू आणि धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द शनिवारी दादांनी सातारा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला. एवढेच नव्हे दादा आज साताऱ्यात पत्रकारांवर एवढे मेहरबान होते की, त्यांनी साताऱ्यात सुसज्ज आणि भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रय़त्न करू असेही आश्वासन दिले आहे.
लाईव्ह चर्चेतच पाहुण्यांमध्ये झाली हाणामारी
अम्मान : टीव्हीवर चर्चा करणारे हे त्या-त्या विषयातील तज्ज्ञ समजले जातात. त्यामुळं आपण अशा तज्ज्ञांना विश्लेषण करताना नेहमी पाहतो. अनेक जोरदार चर्चाही रंगताना आपण पाहिल्या असतील. पण हेच टीव्हीवर चर्चा करणारे तज्ज्ञ जर थेट हातघाईवर येऊन एकमेकांशी हाणामारी करत असतील तर.. हो असाच काहीसा प्रकार जॉर्डनमध्ये एका न्यूज चॅनेलच्या लाईव्ह चर्चेत घडला.
Friday, 18 July 2014
स्थायी समिती अध्यक्षांनी दिला पत्रकारांना दम

बहुजन न्यूज वाहिनीसाठी संपादक वार्ताहर हवेत
हरियाना पंचकुला येथून बहुजन चळवळीवर आधारित बहुजन न्यूज हि वृत्तवाहिनी लवकरच प्रदर्शित होत आहे. २४ तास प्रसारित होणाऱ्या या वृत्तवाहिनीसाठी संपादक, व्हिडीओ एडिटर, ग्राफिक डिझायनर, न्यूज रिडर, एन्कर, क्यामेरामन इत्यादी सर्वच पदे भरावयाची आहेत. ज्यांनी पत्रकारितेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. व ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांनी vikeshsoni007@gmail.com inputbahujannews@gmail.com या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Thursday, 17 July 2014
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची यादी नसल्याने बस पास नाहीत
राज्य शासनाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मुंबई मध्ये बेस्ट बसचे पास देण्याची योजना बेस्ट प्रशासनाने मंजूर केली आहे. तसे पत्र बेस्ट प्रशासनाने संचालक माहिती व जनसंपर्क मंत्रालयाकडे पाठवले असून मंत्रालयातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची यादी मागविली आहे. परंतू माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालकांनी अशी यादी बेस्टकडे पाठवली नसल्याने बहुतेक अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पासच्या सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे.
वैदिकांचे प्रताप

Tuesday, 15 July 2014
काश्मीरबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पत्रकार वैदिक यांची पलटी
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष
पालिका पत्रकार कक्षात भुरट्या पत्रकार आणि उंदरांचा सुळसुळाट
दूरदर्शनसाठी पत्रकार हवेत
भारत सरकारच्या प्रसार भारती द्वारे चालवण्यात येणाऱ्या दूरदर्शनसाठी काही रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या रिक्त जागांसाठी २१ जुलै पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे मास कम्युनिकेशन / पीजी डिप्लोमा या पैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच या कामाचा दोन वर्षाचा अनुभव अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे. या संदर्भातील अधिक माहिती किवा अर्ज ddinews.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी - दूरदर्शन न्यूज, ४१६, टॉवर बी, ४ था मजला, दूरदर्शन भवन, कॉपरनिकस मार्ग, नवी दिल्ली - ११०००१.
सलमान खानवर छायाचित्रकारांचा बहिष्कार
अभिनेता सलमान खान याच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मुंबई मधील छायाचित्रकारांनी घेतला आहे. शुक्रवारी त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांबरोबर अरेरावी केली होती. या प्रकारामुळे सलमान खान याने माफी मागावी अन्यथा २५ जुलैला त्याच्या प्रसिद्ध होणाऱ्या "किक" या चित्रपटाच्या उद्घाटनावेळी एकही फोटो काढणार नाही असा निर्णय छायाचित्रकार संघटनांनी घेतला आहे.
पत्रकार वैदिक - हफीज भेटीवरून राज्यसभा दोनदा तहकूब

योगगुरू रामदेव बाबा यांचे निकटवर्तीय व भाजपशी जवळीक असलेल्या एका मुक्त पत्रकाराने २६-११ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफीज सईद याची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने आज (सोमवारी) राज्यसभेमध्ये गदारोळ केल्याने प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
Sunday, 13 July 2014
मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू
मुंबई मराठी पत्रकार संघाचे २०१४-१५ या वर्षीच्या अभ्यासक्रमांमधील प्रवेश आता सुरू झाले आहेत. पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सहा महिने चालणारा तर वेब पत्रकारिता अभ्यासक्रम हा वर्षभर चालणारा अभ्यासक्रम असे दोन महत्वाचे अभ्यासक्रम पत्रकारसंघातर्फे चालविले जातात. पत्रकारिता प्रमाणपत्रचे अभ्यासवर्ग गुरूवार व शुक्रवार संध्याकाळी सहा ते आठ असे चालतात. वेब अभ्यासक्रमांच्या विद्याथ्यार्ंनाही या अभ्यास वर्गांना उपिस्थत रहावे लागते. त्याशिवाय त्यांच्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान वेबचे तंत्र-मंत्र शिकवणारे अभ्यासवर्ग शनिवारी संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत घेतले जातात. याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघात िटळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अभ्यासवर्ग चालवले जातात. टिमविचे बीजे, एमजे या अभ्यासक्रमांचे प्रवेशही येथे होतात. मुंबई मराठी पत्रकार संघ अाणि टिमवि यांचे संयुक्त अभ्यासवर्ग घेतले जाऊन पत्रकारिता, टीव्ही, जाहिरात, पी.अार., तसेच वेब पत्रकािरतेतील ज्येष्ठ पत्रकार, अभियंते यांचे मारगदर्शनही येथे नियमित प्राप्त होते. अन्य कोणत्याही अभ्य़ासवग्रार्च्या तुलनेत उत्तमशिक्षक, प्रॅक्टिकल ज्ञान येथे मिळते. विद्यार्थी व नोकरी सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणारे १२ वी उत्तीर्ण कुणीही पत्रकार संघाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.
संपर्क - प्रशांत इंदूलकर ९८९२३८५५५४ आणि ०२२-२२७००७१५.
संपर्क - प्रशांत इंदूलकर ९८९२३८५५५४ आणि ०२२-२२७००७१५.
पत्रकार वैदिक यांच्या सईद-मुशर्रफ भेटीनं राजकीय क्षेत्रात खळबळ
भारतातले ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड नेता हाफिज सईद याची भेट घेतली असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या भेटीत त्यांना हाफिज सईद याने मोदींबाबत काही माहितीही विचारली असल्याचंही वेद प्रताप वैदिक यांनी सांगितलं. त्य़ामुळे त्यांच्या या भेटीनं भारताच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.
लाईव्ह इंडिया मध्ये नोकरीची संधी

बांदल यांनी गुन्हे पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून दिली

Friday, 11 July 2014
मिडियाकडून सरकारची चाटूगिरी

Tuesday, 8 July 2014
दहशत पसरवत खंडणी गोळा करणारा संपादक
Monday, 7 July 2014
भुरट्या पत्रकार आणि संघटनामुळे पत्रकार संरक्षण कायदा नाही !
महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर वारंवार हल्ले होत असल्याने पत्रकार हल्ला विरोधी कायदा बनवावा अशी मागणी केली जात असताना सरकारने मात्र हा कायदा बनवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. बेरक्याने याबाबत माहिती घेतली असता पत्रकार कोणाला म्हणावे आणि पत्रकारांच्या अधिकृत नोंदणीकृत संघटना कोणत्या याच स्पष्ट नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कायदा बनवला जात नसल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे.
Saturday, 5 July 2014
वागळे यांनी आयबीएन लोकमत सोडल्याची चर्चा
आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई व त्यांच्या पत्नी सागरिका घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर आयबीएन लोकमतचे निखिल वागळे यांनी सुद्धा राजीनामा दिल्याच्या अफवांना पेव फुटले आहे.
बारामतीतल्या करामती पत्रकाराचा खेळ लवकरच संपणार!
पुण्याहून सकाळीच निघणाऱ्या एका दैनिकाच्या बारामतीतील बातमीदाराचे अनेक कारनामे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने त्याचा डाव लवकरच संपणार असल्याची खात्रीलायक माहिती बेरक्याला मिळाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)