
ओलिस असलेल्या व्यक्ती स्वत:ची ओळख जॉन कँटली अशी सांगतो. कॅमे-यासमोर बोलताना कँटली दाखवण्यात आला आहे. हत्या झालेल्या पत्रकारांप्रमाणेच कँटली यांच्या अंगावरही केशरी रंगाचे कपडे आहेत. त्यांचे २०१२ मध्ये सिरियातून अपहरण करण्यात आले. सध्या आयएसच्या सिरियाचा एक तृतीयांश प्रदेश ताब्यात गेला आहे. ‘लेंड मी युवर इअर्स’ असे व्हिडिओचे शीर्षक आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये ब्रिटनचा सहभाग होता. दोन्ही युद्धे अप्रिय होती. मग आपले सरकार या संघर्षात का पडत आहे, असा सवाल कँटली यांनी केला आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्यामुळेच सरकारला दूषणे देत असल्याचे तुम्हाला वाटेल, परंतु काही गोष्टींची पडताळणी करून सरकारने निर्णय घेतला पाहिजे, एवढे तळमळीने सांगावेसे वाटते. माझ्याकडे आता गमावण्यासारखे काहीही राहिलेले नाही.