
उत्तर प्रदेश - भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारा आणि अश्या बातम्यांना मिर्ची मसाला लावून आपल्या वाचकांना आकर्षित करणारा लोकशाहीचा चौथा स्थंभ किती भ्रष्ट आहे याचा अंदाजा सर्कुलेशनच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २०११ च्या जणगणने नुसार २० करोड आहे. या लोकसंखेपेक्षा कित्तेक पटीने अधिक काही दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक वृत्तपत्रांचे सर्कुलेशन असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संगणकात नोंद झाले आहे. सरकारी जाहिराती मिळवण्याच्या लालसेपोटी एक हजार हून अधिक वृत्तपत्रांनी असे प्रकार केले असले तरी या पैकी काही मोजकीच वृत्तपत्र बाजारात आणि लोकांच्या घरामध्ये दिसत आहे.