पत्रकारांवरील हल्ले

जगभरात 1053 पत्रकारांचे खून 
भारतात 32 पत्रकारांच्या हत्या 
२०१३ मध्ये जगभरात ७६ पत्रकारांच्या हत्या. 
211 पत्रकार तुरूंगात 
भारतात ८ पत्रकारांच्या हत्या .
महाराष्ट्रात २ पत्रकारांच्या हत्या.
महाराष्ट्रात ७३ पत्रकारावर हल्ले.
महाराष्ट्रात ५ पत्रकारांच्या आत्महत्या .
२०१४ - जगभरात 18 पत्रकारांच्या हत्त्या 
महाराष्ट्रात 25 पत्रकारांवर हल्ले. 
भारतात 7 महिला पत्रकाराचा विनयभंग,बलात्कार 

जगभरात 11 नेटिझन्स ऍन्ड सिटिझन्स पत्रकारांची हत्त्या  
2013

2 जानेवारी 13- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला
3 जानेवारी 13 – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद
8 जानेवारी 13- उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला
9 जानेवारी 13- आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी
11 जानेवारी13 – कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले
13 जानेवारी 13-उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण
13 जानेवारी13-नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण
16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या
16 जानेवारी 13- पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या
8 फेब्रुवारी 13-  बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.
10 फेब्रुवारी 13- नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.
4 मार्च 13      – सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
5 मार्च 13-     – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले
12 मार्च 13 – पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी
13 मार्च 13- गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला
14 मार्च 13 – उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला
19 मार्च 13- नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी
21 मार्च 13- निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल
27 मार्च 13- टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण
28 मार्च 13- सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला
29मार्च 13- राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार
30मार्च 13-एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की
31मार्च 13- ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण
1 एप्रिल 13 – सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी
2एप्रिल  13 -वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या
2 एप्रिल 13- मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण
4 एप्रिल 13- पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.
6एप्रिल  13- न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण
13 एपिॅल13- बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण
16एप्रिल 13- नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण
25 एप्रिल 13- विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल
1 मे      13-सोनपेठ येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला
3 ंमे       13 – झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम
7 मे        13 गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर
9 मे        13 सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.
22जून      13 इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. ब ातमीचा राग
26 जून     13 माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.
28 जून     13 आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव यांना धक्काबुक्की.
3 जुलै  13 – नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.
27 जुलै  13- संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.
28 जुलै 13 – पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.
20 ऑगस्ट 13- साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही मारेकरी सापडलेच नाहीत.
31 ऑगस्ट 13- नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल थकबाकीची बातमी दिल्याने राग.
31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.
4 सप्टेंबर   13- आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे यांना मारहाण
4 सप्टेंबर   13 परभणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची दिलीप बनकर यांना मारहाण
6 सप्टेंबर    13- जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.
16 सप्टेंबर 13- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर
21 सप्टेंबर  13- नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.
1ऑक्टोबर 13- जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन तास घरात डांबले.
1 ऑक्टोबर 13- नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.
2 ऑकटोबर 13- मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना मारहाण,धक्काबुक्की.
5 ऑकटोबर 13- आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.
7 ऑकटोबर 13 -चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.
8 ऑक्टोबर 13- आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची मोडतोड.
22 ऑक्टोबर 13- अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला  कव्हरेज करतानाच मारहाण
30 ऑक्टोबर 13- यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.
9 नोव्हेंबर      13- हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.
14 नोव्हेंबर    13- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.
25 नोव्हेबर    13- कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.
30 नोव्हेबर   13 माजलगाव  येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.


2014
पत्रकारांवरील हल्ले,धमक्यांच्या घटना
3 जानेवारी –             
पौड-मुळशी येथील पुढारीचे पत्रकार किसन बाणेकर  यांना स्थानिक पोलिस निरिक्षक मोरे यांना बेकायेशीरपणे डाबले अजित पवार यांना मोरे यांच्या विरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेडा ठरवून सहा तास डांबून ठेवले.
4  जानेवारी-             
नादेड जिल्हयातील मालेगाव येथील लावणी महोत्सवात पत्रकारासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर पुढारी बसले.त्याला पत्रकारांनी आक्षेप घेतल्यावर जि.प.अध्यक्षांचे पीए मिलिंद व्यवहारे आणि मोकल शेळके यांनी पत्रकाराशी असभ्य वागणूक.धक्काबुक्की.
7 जानेवारी-              
माजलगाव येथील पत्रकार जहागिरदार यांनी रस्तयातील कामात झालेल्या गैरकारभाराची बातमी छापल्याबद्दल स्थानिक आमदारप्रकाश सोळंके यांच्या पीएची जिवे मारण्याची धमकी.
8 फेब्रुवारी-                
नवी मुंबई येेथील पत्रकार सागर मेघे याच्यावर हल्ला
9 फेब्रुवारी-                
लातूर येथील पत्रकार रवींद्र जगताप  यांच्यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांा ल्ल्ला,जगताप गंभीर जखमी.
13 फेब्रुवारी-             
अलिबाग येथील पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे यांच्यावर महिला कार्यकर्त्यांकूडन हल्ला.एका कार्यकमात काही महिलांनी डान्स केला.त्याची बातमी      छापल्यामुळे हा हल्ला झाला
17 फेब्रुवारी-             
खोपोली येथील समाज वैबव साप्ताहिकाचे संपादक गोकुळदास येशीकर यांना कॉग्रेस पुढारी अय्युब पटेल यांची मारहाण
18 फेब्रुवारी-              
मुंबई येथील परळ भागात असलेल्या आदिती हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या मिड-डेच्या चार महिला पत्रकारांबरोबर असभ्यवर्तन.सहा आरोपींना अटक.
23 फेब्रुवारी –            
नांदेड जिल्हयातील सावभैौम जनता चे संपादक विवेक केरूरकर यांना पोलिसांची बेदम मारहाण.पोलिसांच्या विरोधातील बातम्यांच्  कारणांवरून ही  मारहाण झाली.
1 मार्च-                       
पिंपरी येथील साप्ताहिक मर्द महाराष्ट्रचे संपादक राम गायकवाड यांना संजय चव्हाण याकडू मारहाण
2 मार्च-                      
इंदापूर येथील प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसवाल्यांक डून मारहाण.यात्रेची बातमी दिल्यामुळे ही मारहाण झाली.आरोपी वकिलाला अटक नाही.
2 मार्च-                      
शिरूर येथील पत्रकार मुकुंद मनोहर ढोबळे यांच्यावर पोलिसांकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा खोट्या आरोपाखाली ्र354 चा गुन्हा दाखल.
3 मार्च-                     
सागली येथील पत्रकार रवींद्र कांबळे यांच्या जय महाराष्ट्र वाहिनीचा लाईव्ह शो बंद पाडला.कांबळे यांना धक्काबुक्की.दमदाटी
17 मार्च-                    
मुंबई येथील जिया न्यूजची महिला पत्रकाराची होळीच्या दिवशी झेडछाड.कॅमेरामनला मारहाण.चार अटकेत.अंधेरीत घडली घटना.
19 मार्च-                     
परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार भागवत शंकराप्पा पोपडे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण.एका कार्यक्रमाची सेना उमेदवाराची बातमी दिल्याने ही मारहाण झाली.
30 मार्च … 
नगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सुळ आणि राहता येथील पत्रकार अशोक सदाफळे यांना बातम्या दिल्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या.
3 एप्रिल          –            
मुंबई येथील जय महाराष्ट्र वाहिनीचे कॅमेरामन दिलीप राय यांना शिवसेना-मनसे दंगलीच्या वेळेस मारहाण त्यांच्या  सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या.ते गंभीर जखमी झाले.
१३ एप्रिल २०१४          
पनवेल येथील साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जाणू वरगडा यांनी वनविभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी छापल्याबद्दल वनपाल ठाकूर यांची पत्नी आणि मुलाने संपादकांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीयवाचक शिविगाळ केली.याची तक्रार पनवेल पोलिसात दिली गेली आहे.
15 एप्रिल 2014        
मुर्तीजापूर येथील पत्रकार निलेश पिंजरकर आणि अन्वरखान यांना संस्थाचालक डॉ.राजेश कांबे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.कांबे यांच्या पॉलिटिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची बातमी छापल्याबद्दल ही धमकी दिली गेली.तक्रार दाखल.गुन्हा नोंदविलाय
17 एप्रिल 2014           
सकाळचे पत्रकार तुषार खरात यांना आमदार जयकुम गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील पांढरवाडी येथील मतदान केंद्रात 17 एप्रिल रोजी मारहाण केली.गोरे आपल्या पन्नास कार्यकर्त्यासह मतदान केंद्रात घुसले आणि मुलाण   नावाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला मारहा त्यावेळी तेथे कव्हरेजसाठी उपस्थित असलेल्या तुषार खरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण केली गेल
25 April 2014                  
पुणे जिल्हयातील वालचंदनगर येथील सकाळचे बातमीदार सचिन लोंढे यांच्यावर आज एका मटका चालकाने हल्ला केला आहे. त्यात ते आणि त्यांचा भाऊ जखमी   झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मारहाणीत सचिन लोढे यांचा हात फ्र्रक्चर झाला आहे. मटका आणि अन्य बेकायदा धंद्याच्या विरोधात सचिन लोंढे बातम्या देत असल्याच्या रागातून यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.
27 एप्रिल 2014                
मुंबई येथील एका वाहिनीचे पत्रकार संजय प्रसाद यांना मालाड भागात काही गुंडांनी मारहाण केली.संजय प्रसाद आपल्या पत्नी सोबत बाजारात गेले असता गुंडांनी पत्रकाराच्या पत्नीची छेड काढली.संजय प्रसाद यांनी जाब विचारला असता पाच-सहा गुंडांनी त्यांना बेदम मारहा .सहा जणाच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केले आहे.
29 April 2014            
कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांना काल सायंकाळी दोन युवकांनी बस स्थानकावर बेदम मारहाण केली त्यात बोरा यांचे डोक   फुटले  आहे.बोरा हे पुण्यनगरी तसेच एका वृत्तवाहिनीचे काम   करतात.बोरा यांचा कुरिअरचा देखील व्यवसाय   आहे.तुमच्याक  कुरिअर द्यायचं आहे असं सांगून त्यांना बस स्थानकावर बोलावण्यात आलं.तेथे त्यांना बेदम मारहाण केली.त्यांच  डोके फुटले                                              असून   त्यांच्या तोंडाला,छातीला मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले
 30   April 2014           
 30 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेवर नेण्यात आलेल्या तोडफोड मार्चाची बातमी देताना खबरे शामतक या दैनिकाने आमदार संचेती  यांचे बंधू सुरेश संचेती यांचे नाव मनसे      कार्यकर्त्यांच्या   नंतर छापले होते.त्यामुळे चिडलेल्या सुरेश    संचेती यांनी फोन करून पत्रकार  विरसिंह राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा शहर आणि तालुका पत्रकार संघाने   निषेध केला   आहे.तसेच एक निवेदन   \प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
7 may 2014                
सातारा जिल्हयातील फलटण येथील एेक्य आणि सकाळच्या कायार्लयावर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला,तोंडाला रूमाल बांधून   आलेल्या या गुंडांनी लोखंडी सळयांनी    दारे,खुच्यार् टेबल तोडले.त्यांची बातमी दिली नाही असा त्यांचा आक्षेप होता.त्यामुळं हा हल्ला झाल्याचं   सागणयात येतंं
18 मे 2014                    
जळगाव येथील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानं एका अपघातात जखमी झालेले सकाळचे बातमीदार गणेश खाबेटे  यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात केली आहे.
19 May 2014            
बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ    यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात स   यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली
22 मे 2014
जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांची 22 मे 2014 रोजी निर्घृण हत्त्या करण्यात आली.पाच तरूणांनी ही हत्त्या केल्याचे समोर आले असून ते सर्व 19 ते21 वयोगटातील आहेत.पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
30 मे 2014
भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या  भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.तसेच देशोन्नतीच्या अंकाची होळी केली
11 जून 2014
सामनाच्या 11 जून 2014च्या अंकात शरद पवारांवर टीका कऱणारा बेताल बडबड या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द झाला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांनी सामनावर मोर्चा काढला,दगडफेक केली,अंकाच्या प्रती जाळल्या.यावेळी शिवसेना- राष्ट्रवादी कार्यकर्त्यात मोठा राडा झाला
16 june 2014
 दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत.