मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या दुफळी माजली असून याचा परिणाम पत्रकार संघाच्या कार्यक्रमावर दिसू लागला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे कामकाजाकडे लक्षच नसल्याने पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पुरस्कार प्राप्त महिला पत्रकारांचे लिंगच बदलण्याचे काम पत्रकार संघाकडून झाले आहे.
Wednesday, 31 December 2014
Saturday, 27 December 2014
महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ !
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी 2014 हे साल सत्वपरीक्षा पाहणारे ठरले. वर्षभरात राज्यात 72 पत्रकारांवर हल्ले झाले, 2 पत्रकाराचे खून झाले, मुंबईत एका पत्रकाराचे अपहरण झाले, 2 महिला पत्रकारांच्या घरावर हल्ले आणि अन्य किमान 4 महिला पत्रकारांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. राज्यातील प्रतिष्ठित अशा सहा दैनिकांच्या कार्यालयावर समाजकंटकांनी हल्ले चढवून कार्यालयांची मोडतोड केली, तर पत्रकारांवर पोलिसांनी खोटे खटले भरण्याचे किमान बारा प्रकार उघडकीस आले आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
Wednesday, 24 December 2014
‘पुढारी’कार पद्मश्री जाधव पत्रकारिता पुरस्कार खाडिलकर यांना प्रदान
मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे देण्यात येणारा ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार दैनिक ‘नवाकाळ’चे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांना राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (२३ डिसेंबर) प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही याची आपण खात्री बाळगा, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.
अहमदनगर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर
अहमदनगर प्रेस क्लब आयोजित अजीजभाई चष्मावाला पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सहा जानेवारी या पत्रकार दिनाच्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षीचे पुरस्कार भूषण देशमुख, महेश देशपांडे, राजेंद्र झोंड, सुधीर लंके, मुरलीधर कराळे, शिल्पा रसाळ, रमेश देशपांडे, इकबाल शेख, समीर मन्यार या पत्रकारांना जाहीर झाले आहेत. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
मुबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रास्ता रोको
पेण-मुबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे यामागणी साठी २३ जानेवारीला पेण येथे एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाल कोकणातील पत्रकारांनी रास्ता रोको आंदोलन केले. गांधी स्मारकापासून निधालेल्या मोर्चातील पत्रकारांनी महामार्गाकडून पेण शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच रास्ता रोको केल्याने पोलिसांनी पत्रकारांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
Monday, 22 December 2014
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा बादशाहाला मुजरा - आजच्या बैठकीमध्ये खडाजंगी होणार
मुंबई मराठी पत्रकार संघावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या पत्रकारालाच पुरस्कार देण्याचे जाहीर केल्याने पदाधिकारी या बादशाहाला मुजरा घालू लागले कि काय असा प्रश्न उपस्थित करत २२ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या मासिक बैठकीमध्ये खडाजंगी होणार असल्याचे वृत्त आहे.
Thursday, 18 December 2014
टीव्हीजेए कॅलेंडरच्या जमा रकमेतून पत्रकारांना मदत करणार
टी. व्ही. जर्नालिस्ट असोशिएशन हि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातल्या पत्रकारांची संघटना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. संघटनेच्या वतीनं येत्या वर्षाचं ( सन २०१५ चे ) कॅलेंडर काढण्यात येणार आहे. त्यातून जो निधी जमा होईल तो पत्रकारांच्या कल्याणासाठी म्हणजेच मेडीक्लेम, आरोग्य शिबिरं, पत्रकारांसाठी अभ्यासवर्ग, अपघात झाल्यास मेडीकलसाठी मदत, किंवा सदस्याच्या अन्य मदतीसाठी वापरात आणण्याच्या योजना टीव्हीजेएच्या आहेत.
पत्रकार संजय पिसाळ यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा
सातारा - जिल्हयात उत्तर कोरेगाव या कायम दुष्काळी पट्टयात पुढारीसह विविध दैनिकांसाठी काम कऱणारे पत्रकार संजय प्रभाकर पिसाळ यांनी मागच्या आठवडयात आत्महत्या केली आहे.संजय पिसाळ किडनीच्या आजाराने त्रस्त होते.त्याना त्यांच्या मावशीनं किडनी दिली आणि पत्रकार मित्रांनी मदत निधी उभा करून ते ऑपरेशनही केलं. मात्र तरीही संजयचा त्रास काही कमी होत नव्हता.त्यासाठीचा दररोजचा होणारा खर्चही त्याना परवडणारा नव्हता.प्रत्येकवेळी मित्रांची मदत घेणेही त्याच्या स्वाभिमानी मनााला पटणारे नव्हते.जेमतेम उत्पन्न असलेल्या संजयनं अखेर आत्महत्या करून आपले जीवन संपविले. पत्रकारांसाठी असलेली शासनाची कोणतीही योजना संजय पर्यत पोहोचलीच नाही.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कारांसाठी आवाहन
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दर वर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन समारंभ आयोजित करण्यात येतो. या समारंभात पत्रकारीतेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी आपल्या विविध लेखांच्या प्रतींची फाईल किंवा पुस्तकांच्या प्रती किंवा इलेक्ट्रोनिक मिडियातील पत्रकारांनी त्यांच्या स्टोरीची क्लिपिंग पत्रकार संघात शनिवार दिनांक २० डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन पत्रकार संघ द्वारे करण्यात आले आहे.
Thursday, 11 December 2014
पत्रकारांना देण्यात येणार्या 'सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कारा'ची घोषणा
'सर्मथन' या मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे प्रतिवर्षी राज्यातील मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या मुद्रित माध्यम तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकरिता करणार्या पत्रकारांना देण्यात येणार्या 'सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कारा'ची घोषणा सर्मथनचे कार्याध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.