नागपूरचे पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे नुकतेच गंभीर आजाराने निधन झाले. ते दै. देशोन्नती नागपूर आवृत्तीचे शहर संपादक होते. समाजिक, राजकिय पत्रकारीतेत त्यांचा दबदबा होता. एक उत्तम माणूस व पत्रकार असलेल्या वानखडे यांना वृतपत्राकडून कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याने देशोन्नती व संपादक पोहरे यांच्याबाबत पत्रकारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.
Sunday, 27 September 2015
लालबागचा राजा - महिला पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण
लालबागच्या राजाच्या दर्शनाला लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून चित्रीकरण करणार्या महिला पत्रकाराला पोलिसांनी धक्काबुक्की करून पोलीस चौकीत डांबून ठेवल्याची घटना शुक्रवारी (25 Sep. 2015) रात्री घडली. |
Friday, 25 September 2015
'त्या' ब्लॉगर्सना 'शोधा आणि ठार करा' ! - इस्लामी संघटनेचे आदेश
ढाका (बांगलादेश) - बांगलादेशमधील एका इस्लामी संघटनेने "धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना शोधा आणि ठार करा‘ असे आदेश आपल्या समर्थकांना दिले आहेत. तसेच जगभरातील धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सची यादीही प्रसिद्ध केली आहे.
पत्रकारांचा पालिका जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जेवणावर बहिष्कार
मुंबई महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी बोले तैसा पत्रकार चाले असे चित्र दिसणाऱ्या पालिकेतील पत्रकारांनी बंड करण्यास सुरुवात केली. नेहमी जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात हु कि चू न बोलणाऱ्या पत्रकारांनी चक्क जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जेवणावरच बहिष्कार घालण्याचा प्रकार गुरुवारी (२४ सप्टेंबर २०१५) घडला आहे.
Tuesday, 15 September 2015
देशमुखांचा धुव्वा उडवत जोशी अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या (१४ सप्टेंबर) पार पडलेल्या निवडणुकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे एस. एम. देशमुख यांचा धुव्वा उडवत पत्रकार यदुनाथ जोशी हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. जोशी हे दै. लोकमतचे विशेष प्रतिनिधी व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
Sunday, 13 September 2015
लालबागचा राजाचा दैनिक मुंबई मित्रवर फौजदारी दावा
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी दैनिक मुंबई मित्र या वृत्तपत्राविरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. लालबागचा राजाने दै.मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, कार्यकारी संपादक उन्मेष गुजराथी आणि महेश वेंगुर्लेकर यांच्याविरूद्ध शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला असून 14 ऑक्टोबरला या खटल्याची सुनावणी होणार आहे.
Saturday, 12 September 2015
वादग्रस्त अधिस्वीकृती समिती बरखास्त करा
मुंबई - ११ / ९ / २०१५ - नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्रच्या प्रतिनिधीनी आज महामहीम राज्यपाल विद्यासागर राव यांचि पत्रकारांच्या विविध समस्यांबत भेट घेतली . संघटनेचे अध्यक्ष डॉ उदय जोशी सरचिटणीस शीतल करदेकर उपाध्यक्ष बाबा लोंढे, किरण बाथम , महिला सरचिटणीस हर्षदा वेदपाठक , ठाणे जिल्हाध्यक्ष दीपक नाईक या प्रतीनिधी मंडळाने राज्यपालाना पत्रकाराच्या विविध समस्यांबाबत माहिती देऊन त्या सोडवण्यासाठी ',शहरी तसेच ग्रामीण पत्रकार यांची पिळवणूक वेठबिगारी थांबवण्यासाठी पत्रकार सुरक्षा आयोगाचे गठन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली करा वी अशी विनंती केली
अधिस्कृति कमेटियों में फेरविचार करके उर्दू पत्रकारों को भी शामिल किया जाए-
महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघ की मांग.औरंगाबाद और बुलढाणा में दिए गए निवेदन
औरंगाबाद ११ सितम्बर २०१५ को महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघ की विभागीय अधिस्कृति कमेटियों में उर्दू पत्रकारों को भी शामिल किया जाये.इस तरह की मांग को लेकर औरंगाबाद बुलढाणा में राज्ये के मुख्यमंत्री,राजयपाल को निवेदन भेजा गया.
चीनमध्ये रोबोटने लिहिली बातमी - पत्रकारांच्या पोटात गोळा
चीनमध्ये गेल्या आठवडय़ात एका वेगळ्याच घटनेत एका यंत्रमानव म्हणजे रोबोटने लिहिलेली बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी उद्योगविषयक असल्याचे समजते. चीनमध्ये आधीच वर्तमानपत्रे सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली आहेत त्यामुळे सरकारला हव्या तशा बातम्या मिळाल्या तर मानवी पत्रकारांची गरज उरणार नाही, या भीतीने तेथील पत्रकारांच्या पोटात भीतीने गोळा उठला आहे.
Friday, 11 September 2015
मुंबई अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी संजय मलमे
मुंबई : मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत महाराष्ट्र संपादक परिषदेचे सदस्य आणि दै. 'पुण्य नगरी'चे संपादक संजय मलमे यांची गुरुवारी सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक गुरुवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य संजीव शिवडेकर, संजय मलमे, प्रवीण पुरो, धर्मेंद्र गोरे, सचिन परब तसेच समितीचे सदस्य-सचिव उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे आदी उपस्थित होते. प्रारंभी इगवे यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व सदस्यांचे संजय मलमे यांना बिनविरोध निवडून देण्यावर एकमत झाल्याने इगवे यांनी त्यांची निवड जाहीर केली.
एक और पत्रकार को मिली जान से मारने की धमकी
मुंबई। मुंबई महानगर में बुधवार (9/9/2015) को एक और पत्रकार को जान से मारने की धमकी मिली है। इस मामले की शिकायत वरिष्ठ पत्रकार अश्विनी कुमार मिश ने भोईवाड़ा पुलिस स्टेशन में बुधवार को दिन में ३ बजे दर्ज करवाई है।