इच्छुक उमेदवार अर्ज भरण्याच्या तयारीत असले तरी उपनगर जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयातील मीडिया सेलमधील अधिकारी "पेड न्यूज‘वर बारीक लक्ष ठेवून आहेत. उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने १४ वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी म्हाडा, महावितरण व एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक वृत्तवाहिनीचे ६९७ तास रेकॉर्डिंग केले जाणार आहे.
Sunday, 28 September 2014
Thursday, 25 September 2014
पत्रकार संरक्षण कायद्याचा उल्लेख जाहिरनाम्यात करण्याची मागणी
महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतचे आश्वासन राजकीय पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात द्यावे अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
Saturday, 20 September 2014
इस्लामिक स्टेटचा आणखी एक व्हिडिओ, ब्रिटिश पत्रकार ओलिस असल्याचे दाखवले

Wednesday, 17 September 2014
अमर उजाला मधील पत्रकारांची फसवणूक
अमर उजाला ग्रुप मध्ये काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचाऱ्यांना पाच महिन्या पूर्वी एक इ मेल पाठवण्यात आला ज्यामध्ये मजिठीया आयोगाच्या शिफारशी नुसार रात्र पाळीमध्ये काम करणाऱ्यांना मे महिन्याच्या वेतनासह रात्रपाळी भत्ता देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु चार महिने झाले तरी अद्याप हा भत्ता देण्यात आला नसल्याने अमर उजालाने पत्रकारांची खुले आम फसवणूक केली आहे.
Monday, 15 September 2014
"तरुण भारत"ची मुंबई आवृत्ती बंद पडण्याच्या मार्गावर
बेळगाव वरून प्रसिद्ध होणाऱ्या तरुण भारतची काही महिन्यांपूर्वीच मुंबई आवृत्ती सुरु करण्यात आली होती. तरुण भारतची ही आवृत्ती नावारूपाला येण्या अगोदरच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वृत्तपत्राच्या मुंबई येथील आवृत्तीची जबाबदारी असलेल्या कोठेकर आणि काळे यांच्याकडून होत असलेल्या जाचामुळे पत्रकार आणि कर्मचारी नोकऱ्या सोडून जात असल्याने लवकरच हि आवृत्ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
Friday, 12 September 2014
' चिंधी चोर ' असा उल्लेख केल्याने पत्रकरांना संपवण्याची सुपारी

Thursday, 11 September 2014
जय महाराष्ट्राचे पत्रकार पगारे यांना न्याय मिळणार

Tuesday, 9 September 2014
तेलंगणा मधील टीव्ही ९ चे प्रक्षेपण सरकारने बंद पाडले

इलेक्ट्रोनिक मिडियामधील स्ट्रीन्जर पत्रकारांना प्रेस कौन्सिल मदत करू शकत नाही
इलेक्ट्रोनिक मिडियामध्ये स्ट्रीन्जर / अंशकालीन पत्रकारांचे मोठ्या प्रमाणत शोषण होते. असेच शोषण होणाऱ्या एका पत्रकाराने आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया कडे दाद मागितली होती. याबाबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने या पत्रकाराला पत्र पाठवूनहा विषय इलैक्टॉनिक मीडिया आणि औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ शी संबंधित येतो. हा विषय प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या खत्यारीत येत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे इलेक्ट्रोनिक मिडियामधील स्ट्रीन्जर / अंशकालीन पत्रकारांना प्रेस कौन्सिल काहीही मदत करू शकत नाही हे समोर आले आहे.
संपादकांची अदला बदल सुरु.....
महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील संपादकांची अदला बदल सुरु झाली आहे. प्रहार वृत्तपत्राचा महेश म्हात्रे यांनी राजिनामा दिल्या नंतर प्रहारला कोणीही संपादक मिळत नव्हते. सध्या जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना संपादक पदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दबंग दुनिया हिंदी दैनिकाच्या संपादक पदी अभिलाष अवस्थी यांना संपादक बनवण्यात आले आहे.
Monday, 8 September 2014
टीवी जर्नालिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

पत्रकार वेदप्रताप वैदिक पुन्हा बरळले

Thursday, 4 September 2014
पश्चिम घाट वाचवण्यासाठी पत्रकाराची सायकल यात्रा
मानवी हस्तेक्षेपामुळे पश्चिम घाट आणि तेथील प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम घाटाला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी कोयंबतूरच्या एका दूरचित्रवाहिनीच्या आर. कलाई सेलवन या पत्रकाराने तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक या चार राज्यामध्ये ३०८० किलोमीटर सायकल वरून प्रवास केला आणि पश्चिमी घाट वाचवण्याचा संदेश दिला. पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
Wednesday, 3 September 2014
पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ यांची हत्या - हत्येचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी जारी केला

Tuesday, 2 September 2014
‘पीटीव्ही’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला

"वस्त्रहरण" सुरु
मुंबई येथून वस्त्रहरण नावाचे नवीन मराठी मासिक सुरु करण्यात आले आहे. हे मासिक सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. वस्त्रहरण मासिकाचे संकेतस्थळ (वेबसाईट) vastraharan.org असे आहे. या मासिकाला जाहिरात प्रतिनिधींची आवश्यकता असून लवकरच मासिकाद्वारे जाहिरात एजन्सी सुरु केली जाणार आहे. या एजन्सीच्या माध्यमातून मराठी वुत्तपत्राना जाहिराती पुरवल्या जाणार आहेत. तरी अधिक माहिती साठी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी 9987009000 क्रमांकावर किंवा वसंत विहार, कुंभारवाडा बस थांब्या जवळ, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई - या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)