Monday, 16 June 2014

देशोन्नतीच्या पत्रकारावर वाळूमाफियाचा हल्ला

attack-1
http://berakya.blogspot.in 
दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत. महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांवर हल्ला करणारे वाळूमाफिये आता बेफाम झाले असून, माफियांच्या विरोधात बातम्या छापणार्‍या व त्यांना जाब विचारणार्‍या पत्रकारांच्या जिवावर उठले आहेत. विविध पत्रकार व पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीवर् शब्दात निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.