‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी (चिकणघर / म्हारळ) निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Friday, 27 June 2014
कौटुंबिक वादातून पत्रकाराची हत्या
‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी (चिकणघर / म्हारळ) निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Thursday, 26 June 2014
आयबीएन लोकमतचे सुधाकर कश्यप विधानसभा लढवणार
आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी मुंबई मधून वृत्तसंकलन करणारे सुधाकर कश्यप यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कश्यप हे मुंबईच्या वरळी विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवणार असल्याच्या बातमीची सध्या "व्हाट्सअप"वर चर्चा आहे. सुधाकर कश्यप यांना तळागाळातील समस्यांची माहिती आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून कश्यप यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले असून कित्तेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. यामुळे सध्या मंत्री असलेले सचिन अहिर यांना वरळी विधानसभा मतदार संघामधून चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कश्यप यांना धमकी मिळाल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे.….
सुधाकर कश्यप यांना बेरक्याच्या शुभेच्छा !!!
Monday, 23 June 2014
पत्रकार हल्ला व संरक्षण कायद्याची लढाई आता केंद्रीय स्तरावर
महाराष्ट्रामधील पत्रकारांना नोकरी व हल्ल्यापासून संरक्षण मिळावे तसेच पत्रकारांच्या सबंधित विविध कल्याणकारी मागण्यांसदर्भात चर्चा करण्यास वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने आता केंद्रीय स्तरावर या मागण्यांचा पाठपुरावा करू अशी माहिती "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" (JUM)चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी दिली आहे.
'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांचा आत्महत्येचा प्रयत्न

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांनी कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे . शर्मा यांनी आैषध-गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मा यांच्या सहकारी वर्गाने आत्महत्येच्या धमकीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. नंतर तिला जानकबाद कार्यालयाच्या गेटवर जेव्हा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर खळबळ माजली. तनू शर्मा यांना तातडीने चॅनलच्या गाडीतून तात्काळ कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Sunday, 22 June 2014
तंटामुक्त मोहिमेला प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीपणे राबविण्यासाठी पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदार, स्तंभलेखक आणि मुक्त पत्रकारांना पुरस्कार देण्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सोमवार दिनांक 30 जून 2014 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
Saturday, 21 June 2014
चॅनलच्या प्रमुखांना तरुणी दिली भेट - प्रकरणाची चौकशी सुरु
दक्षिण आफ्रिकेच्या एका चॅनलच्या प्रमुखांना चक्क एक तरुणी, एक गाय आणि तिचे कोकरू भेट म्हणून देण्यात आले आहे. या प्रकारांची चोकशी करण्याची मागणी स्थानिक महिला संघटनांनी केल्यावर स्थानिक सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
Friday, 20 June 2014
युक्रेनमध्ये 5 पत्रकार ठार, 200 जखमी
युक्रेनमध्ये गेल्या पाच महिन्यात पाच पत्रकारांना ठार कऱण्यात आलंय तर दोनशेवर पत्रकारांवर हल्ले करून त्यांना जखमी केलं गेलंय.ज्या पत्रकारांना ठार केलं गेलंय त्यामध्ये ऑझ्रीया रोक्केली,आंद्रेई मिरोनोव,वेस्ती नावाच्या वृत्तपत्राचा एक पत्रकार व्याचेस्लाव वेरेमेई,रशियाच्या टेलिव्हिजन चॅनल आरटीआरचे इगोर कोर्निल्यूक आणि अन्तोन वोलोशिन यांचा समावेश आहे.मानवाधिकार संघटना रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरने ही माहिती दिली.
Wednesday, 18 June 2014
केंद्र सरकार करणार पत्रकार संरक्षण कायदा
पत्रकार सुरक्षा कायदा करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली असून हा कायदा लवकरात लवकर कऱण्याचा पुनरूच्चार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली समितीच्या एका शिष्टमंडळाने प्रकाश जावडेकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
Monday, 16 June 2014
देशोन्नतीच्या पत्रकारावर वाळूमाफियाचा हल्ला
http://berakya.blogspot.in
दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत. महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांवर हल्ला करणारे वाळूमाफिये आता बेफाम झाले असून, माफियांच्या विरोधात बातम्या छापणार्या व त्यांना जाब विचारणार्या पत्रकारांच्या जिवावर उठले आहेत. विविध पत्रकार व पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीवर् शब्दात निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रक्तादान शिबिराचे आयोजन
http://berakya.blogspot.in
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने व डॉ. सगुण नगरे आणि शिला (माई) नगरे यांच्या सहकार्याने आज रविवार दि. १५ जुन २०१४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने व डॉ. सगुण नगरे आणि शिला (माई) नगरे यांच्या सहकार्याने आज रविवार दि. १५ जुन २०१४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Sunday, 15 June 2014
महर्षी नारद पुरस्कार जाहीर
नारद जयंतीचे औचित्य साधून विश्व संवाद केंद्राने महर्षी नारद पुरस्कारांची घोषणा केली आहे. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्रा, महिला पत्रकार मेघना ढोके यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इंडियन र्मचंट चेंबरच्या सभागृहात २१ जून रोजी सायंकाळी ठीक ५.४५ वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार संरक्षण कायदा आणि वृध्द पत्रकारांना पेन्शन - प्रस्ताव येत्या कॅबिनेटसमोर
पत्रकार संरक्षण कायदा आणि वृध्द पत्रकारांना पेन्शन देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटसमोर मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शनिवारी दिले.विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत आर.आर.पाटील यांनी पत्रकारांना गुंडांपासून तर संरक्षण मिळालेच पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय़पणे आपले काम करता आले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनबाबतचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेऴी सांगितले.
Saturday, 14 June 2014
अजगराने चावा घेतल्यानंतरही पत्रकाराचे रिपोर्टिंग
मुंबई बांद्रा येथील शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री निवस्थानाबाहेर शुक्रवारी एक नऊ फुटांचा अजगर सापडला. सुरक्षेच्या दृष्टीनं एवढ्या संवेदनशील ठिकाणी हा अजगर सापडल्यानं "झी"चे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे ही बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा अजगर कसा आला आणि त्याला कसं पकडण्यात आलं, याबद्दल पोलिसांशी बातचित करत असताना अजगरानं पत्रकार दिनेश दुखंडेच्या हाताचा चावा घेतला. महत्त्त्वाची बाब म्हणजे अजगरानं चावा घेतल्यानंतरही दिनेश दुखंडे डॉक्टरकडे न जाता आधी ऑफिसला गेले. त्यांनी अजगराचे व्हिज्युअल्स आणि पोलिसांचे बाईट्स ऑफिसमध्ये सोपवले आणि मग ते डॉक्टरांकडे गेले. अजगरानं चावा घेऊनही दिनेश दुखंडे यांनी आधी बातमी दिली आणि मगच डॉक्टरांकडे गेलेत. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यांच्या या पत्रकारितेतल्या धैर्याचं आणि निष्ठेचं कौतुक केले जात आहे. अश्या पत्रकारांना बेरक्याचा सलाम.
पेड न्यूज प्रकार गैरच - केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
मुंबई : गेल्या काही निवडणुकांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर पेड न्यूजचे प्रकार घडले आहेत.पेड न्यूज राजकीय असो किंवा गैर राजकीय. हा प्रकारच गैर असून तो नाकारणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे. या कारणास्तव प्रसारमाध्यमांनी जागरुक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. दूरदर्शन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते.
Thursday, 12 June 2014
पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शनिवारी विधान भवनात बैठक
सामनाच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
मुंबईतील सामना कार्यालयावर आज (११ जूनला ) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून सामनातील अग्रलेखाबद्दल निषेध केला.यावेळी सामनाच्या अंकाची होळी केली गेली.यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.सामना कार्यालयासमोर सध्या तणाव असून रॅपिड ऍकश्न फोर्सला पाच़ारण करण्यात आलं आहे.
Wednesday, 11 June 2014
न्यूज अँकर होतेय स्पेनची महाराणी
ब्लूमबर्ग आणि सीएनएन प्लसच्या पत्रकार आणि न्यूज अँकर राहिलेल्या लेटिजिया आता स्पेनच्या महाराणी होत आङेत.त्या स्पेनचे युवराज फिलिप यांच्या पत्नी आहेत.18 जून रोजी फिलीप स्पेनचे महाराजा होत आहेत. महाराजा जुआन कार्लोस यांनी सरकारची बागडोर आता फिलीप यांच्या खांदयावर सोपविली जात असल्याची घोषणा केलीय.स्पेनमध्ये राजाच देश आणि लष्कराचे प्रमुख असतात.महाराणी सोफियाचं स्थान आता प्रिन्सेस लेटिजिया घेणार आहे 1975 सोफिया महाराणी आहेत.फिलीप यांच्याशी विवाहबध्द होण्यापूर्वी लेटिजिया पत्रकार आणि ऍन्कर होती.प्रिन्स फिलीपबरोबर त्याचा हा दुसरा विवाह आहे.
कमांडोकडून पत्रकारास बेदम मारहाण
चंदिगड येथील ऑपरेशन सेलमध्ये तैनात असलेल्या एका कमांडोने गुंडागर्दीच्या सर्व सीमा पार करीत आज (Jun 10, 2014 )पत्रकाराला एक े-47 ने जबर मारहाण केली.कमांडोच्या या हल्ल्यात पत्रकार अविनाश गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.
Monday, 9 June 2014
पत्रकारांवर हल्ले : केंद्रीय कायदा विचाराधीन
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असून पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायदा बनवण्याच्या शक्यतेचा सरकार विचार करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी रात्री मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केले. ते येथील प्रेस क्लबच्या रेड इंक पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
Sunday, 8 June 2014
कष्ट विका पण तुमचा आत्मा शाबूत ठेवा – पी.साईनाथ
आजची माध्यमं केवळ कार्पोरेट कंपन्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असून ती जनतेपासून तूटत चालली आहेत अशी खंत ज्येष्ट पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केली आहे. असोसिएशन ऑफ इलेक्टॉनिक मिडियाच्यावतीनं पुण्यात आयोजित चौथ्या व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.कार्पोरेट कंपन्या आणि माध्यमातील साट्यालोट्यावर त्यांनी नेमके बोट ठेवले.
Saturday, 7 June 2014
जिओ न्यूजला टाळे
मुंबई - गोराईत पत्रकार तरुणीवर बलात्कार
लग्नाच्या भूलथापा देऊन महिला पत्रकारावर बलात्कार केल्याप्रकरणी गोराई पोलिस ठाण्यात कपिल इंगोले (30) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तो जनसंपर्क क्षेत्रातील कंपनीत कामाला आहे. विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या कपिलचे एका पत्रकार तरुणीशी प्रेमसंबंध होते. लग्नाच्या भूलथापा देत त्याने तिला गोराई येथे नेऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर काही दिवसांनी पीडित तरुणीला वर्णावरून हिणवत तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कपिल फरारी झाला आहे.
Friday, 6 June 2014
पालिका वार्ताहर संघाच्या सेटिंगवाल्या निवडणुकीची घोषणा
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महानगरपालिकेमधील पत्रकार व त्यांच्या वार्ताहर संघटनेचे बेरक्याने वाभाडे काढल्यावर वार्ताहर संघाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. निवडणूक घेताना पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी नेमल्याने यावेळीही जनसंपर्क अधिकारी ठरवणार तेच पत्रकार पदाधिकारी होणार असल्याने अश्या सेटिंगवाल्या निवडणुका घेण्याची गरजच काय असा प्रश्न वार्ताहर संघाच्या काही सभासदांनी विचारला आहे.
Wednesday, 4 June 2014
पत्रकारांवरील हल्ले / प्रेस कौन्सिल करतेय नवे नियम - न्या.मार्कन्डेय काटजू
पत्रकारांवरील वाढते हल्ले,पत्रकारांच्या वाढत असलेल्या हत्त्यांची दखल अखेर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं घेतली असून या संदर्भात कौन्सिल पत्रकारांच्या हितासाठी काही नवीन नियम तयार करीत असल्याची माहिती प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू यांनाी काल पणजी येथे दिली.
राजदीप सरदेसाई गेले सुट्टीवर
आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई हे आजपासून प्रदीर्घ रजेवर गेलेत.मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने नेटवर्क 18 समुहाची खरेदी चार हजार कोटींना केलीय.या पार्श्वभूमीवर राजदीप रजेवर गेल्याचं समजतंय.राजदीप यांंच्या पत्नी आणि उप मुख्यसंपादक सागरिका घोष या देखील रजेवर गेल्याचं सांगण्यात येतं.सूत्रांच्या माहिती नुसार राजदीप आणि सागरिका पुन्हा कामावर येण्याची शक्यता फारच कमी आहे.
ओरिसात पत्रकाराची हत्त्या
ओरिसातील टीव्हीचे पत्रकार तरूण आचार्य यांच्या हत्त्येची चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी आणि आचार्य यांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी पत्रकारांनी आज (२ जून २०१४) भुवनेश्वर येथे निदर्शने केली. ओरिसा जर्नालिस्ट असोसिएशनने या हत्याकांडाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.भुवनेश्वर जिल्हा पत्रकार संघानेही घटनेचा निषेध करीत आ़चाय यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यौची मागणी केलीय.गंजाम जिल्हयातील खलीकोट येथे एका वाहिनीसाठी काम करणाऱे आचार्य यांची मागच्या मंगळवारी अत्यंत निर्दयपणे हत्त्या केली गेली आहे.
आमदाराने पत्रकाराची नोकरी घालविली
कधी पत्रकारांवर प्रत्यक्ष शारीरिक हल्ले करून,कधी धमक्या देऊन तर कधी पत्रकारांवर खंडणी मागितल्याचे किंवा विनयभंगाचे खोटे खटले दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो. पत्रकार ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या पत्राच्या व्यवस्थापनावर दबाव आणून किंवा व्यवस्थापनाला धमकावून पत्रकारांना आयुष्यातून उठविण्याच्या घटना महाराष्ट्रात अनेक घडलेल्या आहेत.अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे.स्थानिक आमदाराच्या विरोधात बातमी देणे हिंदुस्थानचे पत्रकार अनिल ओझा यांना महागात पडले आहे.
Tuesday, 3 June 2014
सत्यकथा' मासिकाचे संपादक राम पटवर्धन कालवश
मौज प्रकाशनाचे संपादक राम पटवर्धन यांचे आज निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. 'मराठी साहित्यातील हेडमास्तर' अशी ख्याती असलेल्या पटवर्धन यांनी 'सत्यकथा' या मासिकाचे साक्षेपी संपादन केले होते. श्री. पु. भागवत यांच्या सोबतीने त्यांनी 'मौजे'मधून अनेक लेखक घडविले.
बेरक्या इफेक्ट - पालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाचा महामुणकर यांनी दिला राजीनामा
मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकारयाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्ष पदाचा सुजित महामुणकर यांनी राजीनामा दिला आहे. महामुणकर यांनी राजीनामा दिल्याने बिनकामाचा नामधारी अध्यक्ष गेल्याने खूप बरे वाटते आहे अशी प्रतिक्रिया वार्ताहर संघाच्या काही पदाधिकार्यांनी खाजगीमध्ये व्यक्त केली आहे.
Monday, 2 June 2014
देशोन्नतीच्या कार्यालयावर भंडाऱ्यात हल्ला
भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.
पत्रकारांचे २५ जून रोजी कशेडी घाट रोको आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लगेच सुरू करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत असून याच मागणीसाठी येत्या २५ जून रोजी कशेडी घाटात रस्तारोको कऱण्याचा निर्णय रविवारी पेण येथे रायगड प्रेस क्लब आणि रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)