Saturday, 30 August 2014

लालबागच्या राजावर "टीव्हीजेए"चा बहिष्कार कायम

मुंबई मधील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिडियामुळे प्रसिद्ध झाले. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यावर मंडळाने ज्या मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली त्याची जाण ठेवलेली नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भाषा आणि वाईट वागणूक याचा अनुभव येथील भक्तांना दरवर्षी येत असतो. असाच वाईट अनुभव पत्रकाराना, मिडियाला येत असतो. मिडियाला, पत्रकारांना मिळणारी वागणूक आणि मिडीयाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लालबागच्या राजाचे कव्हरेज करू नये असा मागील वर्षी निर्णय घेण्यात आला होता. लालबागच्या राजाचे कव्हरेज करू नये असा मागील वर्षी घेण्यात आलेला निर्णय या वर्षीही कायम असल्याचे टीव्हीजेए (  टीव्ही जर्नालीस्ट असोसिएशन ) चे अध्यक्ष विलास आठवले यांनी सर्व वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना कळविले आहे.

Wednesday, 27 August 2014

'गल्लीन्यूज'ला सोशल मीडिया पुरस्कार

मुंबई - व्हॉटस्‌ऍप व इतर नवीन सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून बातम्या पोचवण्याचे काम करणाऱ्या "गल्लीन्यूज ग्रुप‘ला बेस्ट सोशल मीडिया पुरस्काराने गौरवण्यात आले. बिर्ला मातुःश्री सभागृहात नुकताच हा पुरस्कारप्रदान सोहळा झाला. सोशल एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. 

रांची, रीस्म येथे पत्रकारांवर हल्ला - एक जखमी

रांची - येथील रीस्म परीसात मंगळवारी रात्री उशिरा जुनिअर चिकित्सकांनी वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला केला. पत्रकारांवर हल्ला करण्यात आल्याने बरीयातू पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद कुमार पत्रकारांना वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दैनिक "हिंदुस्तान टाइम्सचे" पत्रकार दीपक महतो यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अनुप बीरथरे पोहोचले असता त्यांच्याशीही बाचाबाची करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सीपीआयची निदर्शने

भुवनेश्वर : कीस मधील विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी बाचाबाची करून केलेल्या हाणामारीच्या निषेधार्थ मंगळवारी सीपीआय पक्षाच्या वतीने मास्टर क्यान्टींग चौका मध्ये निदर्शने केली. सीपीआय नेते सूर जेना यांच्या नेतृत्व मध्ये करण्यात आलेल्या निदर्शनावेळी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्याना त्वरित अटक करावी तसेच कीट आणि कीस कडून जमीन हडप करण्याच्या प्रकारची सीबीआय चौकशी करावी अश्या मागण्या करण्यात आल्या. मिडिया व पत्रकार हे आपल्या देशाचे चौथा स्तंभ आहेत त्यांच्यावर हल्ला करणे योग्य नाही. पत्रकारांवर हल्ला केल्याने कोणताही पत्रकार शोध पत्रकारिता करू शकणार नाही असे जेना यांनी सांगितले.

Tuesday, 26 August 2014

पालिकेतील पत्रकार निघाले फुकटच्या दारू आणि मटणाच्या पार्टीला......

मुंबई महापालिकेद्वारे दर वर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे कशी भरली आहेत हे पत्रकारांना दाखवण्यासाठी एक दौरा आयोजित केला जातो. पत्रकारांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि पाहणी दौरा असे नामकरण करून काढल्या जाणाऱ्या या दौर्यामध्ये पत्रकारांना दारू आणि मटणाच्या पार्टी देवून खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईकर नागरिकांच्या कर रूपामधून जमलेल्या निधीमधून आयोजित केल्या जाणाऱ्या दौऱ्यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य, महापौर, पत्रकार, आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी असतात. 

सीरियातील अमेरिकन पत्रकाराची सुटका

वॉशिंग्टन - सीरियामधील दहशतवाद्यांनी गेल्या दोन वर्षांपासून बंदी बनविलेल्या एका अमेरिकन पत्रकाराची अखेर सुटका करण्यात आली. पीटर थेओ कर्टीस (वय 45) याला सीरियामधील बंडखोर दहशतवाद्यांची संघटना असलेल्या अल नुस्रा फ्रंटने ऑक्‍टोबर 2012 मध्ये बंदी बनविले होते. अल नुस्रा फ्रंट ही अल कायदाशी संलग्न संघटना आहे. 

Sunday, 24 August 2014

खंडणी मागणारे २ पत्रकार अटकेत

येरवडाः कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांना बदनामीची धमकी देऊन खंडणी घेणाऱ्या एका साप्ताहिकाच्या दोन पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे. बळीराम येडबा ओहोळ (वय ३६) आणि संदीप शिवाजी भंडारी (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Saturday, 23 August 2014

जेष्ठ पत्रकार विजय मिश्रा यांना मारहाण

शेगाव येथील स्थानिक जेष्ठ पत्रकार विजय मिश्रा यांना काल ( २१ ऑगस्ट ) एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने मारहाण केली. प्रवीण बोदडे आणि एका युवकाने मिश्र यांना विनाकारण मारहाण केली आहे. एका महिन्यात पत्रकारांना मारहाण होण्याची दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी शेगावच्या पत्रकार देवानंद उमाले आणि एकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. 

Friday, 22 August 2014

अमेरिकन पत्रकाराच्या हत्येचा राष्ट्रसंघाकडून निषेध

संयुक्त राष्ट्रसंघ - इराकमध्ये एका अमेरिकन पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या घटनेचा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. अमेरिकेचे मुक्त पत्रकार असलेल्या जेम्स फॉली यांची इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक (आयसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी गळा चिरुन हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

Thursday, 21 August 2014

अमेरिकेच्या पत्रकाराचे शिरकाण

बगदाद - अमेरिकेचा पत्रकार जेम्स फोली याचं शिरकाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ इराकमधील ISIS ने सोशल मिडियावर टाकला आहे. या व्हिडिओच्या अखेरीस आणखी एका पत्रकाराला पकडल्याचे त्यांनी दाखवले आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढील निर्णयावर त्याचं जीवन अवलंबून असेल अशी धमकी ISIS ने दिली आहे. 

Monday, 18 August 2014

राज ठाकरे यांची माध्यमांवर आगपाखड

मनसेची ब्ल्यू प्रिंट कधी जाहीर होणार याच्या तारखा परस्पर जाहीर केल्या जात आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या ब्ल्यू प्रिंटच्या उद्घाटनाला रतन टाटा आणि मुकेश अंबानी येणार असेही सांगितले जात आहे... परंतु, ना मला त्याची कल्पना आहे ना रतन टाटांना ना आंबानी यांना. सोशल मिडियावर कुणी काही पुडी सोडतो आणि त्याच्या बातम्या केल्या जातात. ब्ल्यू प्रिंट झाली की मी जाहीर करेन. त्यासाठी दारावर सारखी टकटक कशाला असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी माध्यमांवर आगपाखड केली.  

आरोपीच्या मिडिया ट्रायलला बंदी

आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याची छायाचित्रे व त्याच्याविषयीचा तपशिल प्रसार माध्यमांना उघड करण्यास मनाई करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे तयार करावीत, असा आदेश नुकतेच हायकोर्टाने दिला. त्याबद्दल धोरण तयार होईर्यंत सध्याच्या निर्बंध निकषाचे पालन करण्यात यावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले. 

Sunday, 17 August 2014

होंडुरास मध्ये पत्रकाराची हत्या

योरो - तेगुसिगाल्पा: होन्डुरास मध्ये पत्रकारांच्या हत्तेचे सत्र अजूनही सुरूच आहे. गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी आणखी एका टीव्ही साठी काम करणाऱ्या नेरी सोटो (३१) या पत्रकाराची हत्या केली आहे. सोटो हे योरो प्रांतच्या "'चैनल २३' वर कार्यक्रमात निर्देशन करत होते. एफे या समाचार एजन्सीला पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोटो यांचे सर्व सामान आणि पैसे जागच्या जागी आहेत, हा खून पैशांसाठी केलेला किवा चोरीच्या उद्देशाने केलेला दिसत नाही. यामुळे हत्तेची सखोल चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. या वर्षी सात पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे असे पोलीसान सांगितले आहे. तर योरो प्रांतातील मानवाधिकार आयुक्त यांच्या माहिती नुसार नोव्हेंबर २००३ पासून आता पर्यंत ४७ पत्रकारांची व मिडिया कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे. 

Friday, 15 August 2014

लाचखोर पोलीस व पत्रकार गजाआड

मुंबई मधील मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फुलसिंग पवार यांचे कार्यालयीन मदतनीस, पोलीस शिपाई उमेश जोशी व पत्रकार सिद्धार्थ धाडवे यांना लाचलुचलप प्रतिबंधक विभागा(एसीबी) ने ४ हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केली आहे. धाडवे राज्यातील एका प्रमुख वृत्तवाहिनीचे अंशकालीन वार्ताहर आहेत. जोशी यांच्या सांगण्यावरून त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रचलेल्या सापळ्यात धाडवे रंगेहाथ पकडले गेले. मात्र धाडवे यांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास एसीबी करत आहे.

Thursday, 14 August 2014

साप्ताहिक विवेकचे माजी संपादक बळवंत जोग यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बळवंत नारायण जोग (वय 90) यांचे बुधवारी दुपारी तीन वाजता मुलुंड येथे खासगी रुग्णालयात वार्धक्‍याने निधन झाले. ते अविवाहित होते. आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा घेतलेल्या बळवंत जोग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरवातीपासून काम केले आहे. जोग यांनी स्वातत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, दीनदयाळ उपाध्यय, गोळवलकर गुरुजी यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील टाटा कॉलनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sunday, 10 August 2014

पत्रकारांना वेगळा संरक्षण कायदा कशाला हवा - जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी

पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपली जात पंथ बाजूला ठेवून काम केले पाहिजे असे आव्हान करताना पत्रकारांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला आहे. कोणावर काही अन्याय अत्याचार झाल्यास भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करता येतो मग पत्रकारांसाठी वेगळा कायदा कशाला हवा, पत्रकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत नाहीत का असे प्रश्न उपस्थित करून पत्रकारांना वेगळा संरक्षण कायद करण्यास आपला विरोध आहे असे स्पष्ट मत जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी 'जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र'च्या मीरा रोड येथे आयोजित पत्रकार मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.  

महेश म्हात्रे यांची आयबीएन - लोकमतच्या डेप्युटी चिफ एडिटर पदी नियुक्ती

आयबीएन रिलायंस समूहाच्या अंबानी यांनी विकत घेतल्यावर आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक निखील वागळे यांनी राजीनामा दिला होता. वागळे यांच्या राजीनाम्यानंतर आयबीएन लोकमतचे संपादक पद रिक्त होते. आता मुख्य संपादक हे पद रिक्त ठेवून त्या ऐवजी दोन डेप्युटी चिफ एडिटर अशी दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यापैकी एक पदावर दैनिक प्रहारचे संपादक महेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. 


शेतकरी मासिक खासगी स्टॉल्सवरही मिळणार

शेतकऱ्यांच्या हितार्थ प्रकाशित करण्यात येणारे ‘शेतकरी मासिक’ आता खासगी स्टॉल्सवरही उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या निर्णयास शासनाने मान्यता दिली असून अंकांच्या किंमतीतही 15 रुपयांवरुन 25 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. 

Saturday, 9 August 2014

५ भुरट्या पत्रकारांना खंडणी वसुल करताना पकडले

 उत्तर प्रदेश शाहजहांपुर - पत्रकारितेला बदनाम करणाऱ्या ५ भुरट्या पत्रकारांना कोतवाली पोलिसांनी महामार्गावर प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुल करताना पकडले आहे. प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यावर पत्रकारांना दंड बसवण्यात आला आहे. अजीजगंज पोलिस ठाण्याच्या वि के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले कित्तेक महिने टोल ट्याक्स केंद्राजवळील भुरट्या पत्रकाराकडून वसुली केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापाळा रचून या ५ जणांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

पत्रकारांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

अमृतसर येथे शिख समुदायावर झालेल्या लाठीचार्जचे वृत्तसंकलन करायला गेलेल्या पत्रकारांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्ज विरोधात चंदिगढ पंजाब जर्नलिस्ट एसोसिएशन द्वारे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हरयाणा सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. धर्म सिंग मार्केट येथून निघालेला मोर्चा हॉल गेट येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचा पुतळा जाळण्यात आला. भारतात आज पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारंवर ओलिस लाठीचार्ज करत आहेत या प्रकारांची चौकशी करून पत्रकारांना नुकसान भरपाई मिळावी तसेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार गुरमिंदर सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. 

Thursday, 7 August 2014

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमिक शृंखला 'चाचा चौधरी'तील चाचा व साबू या व्यक्तिरेखांच्या चित्रांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गुरगावमधील मेदांता रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते.

Wednesday, 6 August 2014

तरुण भारतला डिफेन्स करन्स्पोन्डेंट कोर्सचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान

मुंबई - संरक्षण मंत्रलयाकडून प्रत्येक वर्षी डिफेन्स करस्पोंडेंट कोर्सचे आयोजन केले जाते. या कोर्सकरिता देशभरातून ज्या पत्रकारानी डिफेन्स पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. अशा ३१ जणांची निवड केली जाते. 

महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या भुरट्या पत्रकाराला अटक

मध्य प्रदेश मधील बरुडठाणे सिनखेडा येथील एका व्यक्तीने पत्रकार बनून महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या पकडून या भुरट्या पत्रकाराला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी या भुरट्या पत्रकाराची रवानगी जेल मध्ये केली आहे. 

Tuesday, 5 August 2014

कर्नाटक पोलिसांची पत्रकारांनाही धमकी

कर्नाटक मध्ये मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे कर्नाटक पोलिस आणि तेथील सरकारच्या विरोधात संताप पसरला आहे. कर्नाटक मधील मराठी भाषिकांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन केली जात असून कित्तेक ठिकाणी बंद पाळला गेला आहे. कर्नाटक मधील मराठी भाषिक जनतेच्या व नेत्यांच्या मुलखाती घेण्यासाठी, तसेच त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी "मी मराठी" या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर व सुरेश ठमके हे पत्रकार गेले असता त्यांना मुलखाती घेण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले. तसेच त्यांना कर्नाटक सोडून जा नाहीतर अटक करू अशी धमकी दिली आहे. कर्नाटक सरकार आणि पोलिस पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकाराचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. घडल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप पसरला असून कर्नाटक सरकार आणि पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आला आहे.


Saturday, 2 August 2014

इजराइल फिलीस्तीन मध्ये पत्रकारांना टार्गेट करून मारत आहे – जेयूसीएस

इजराइल फिलीस्तीन में पत्रकारों की कर रहा है ‘टारगेट किलिंग’ –जेयूसीएस

लखनऊ : जर्नलिस्ट यूनियन फॉर सिविल सोसाइटी (जेयूसीएस) द्वारे इजराइली सेने द्वारे मारल्या गेलेल्या पत्रकार रामी रॉयन, अहद जकाउत, खालिद हमाद, नजला महमूद हज, अब्दुरहमान जियाद अबु हिन, इज्जत दुहैर, बहाउद्दीन गरीब यांच्या पत्रकारितेला सलाम करत श्रद्धांजली वाहिली. तसेच इजराइली वस्तूंवर बहिष्कार घालावा असे आवाहन केले आहे.

"प्रहार" वृत्तपत्रात नोकरीची संधी

मुंबई मधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक "प्रहार" मध्ये उप वृत्तसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर या पदा साठी भारती करण्यात येत आहे. तशी जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुकांनी प्रहारच्या दिलेल्या पत्यावर संपर्क साधावा.