Monday 28 July 2014

प्रकाश अकोलकर प्रेस क्लबचे अध्यक्ष

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रकाश अकोलकर यांची तर चेअरमनपदी गुरबीर सिंह यांची निवड झाली आहे. प्रेस क्लबच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीमध्ये राजेश मस्करेन्हास यांची सचिवपदी तर कुमार केतकर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे. अभिजीत साठे आणि मृत्युंजय बोस यांची क्रमश: संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर संतोष आंधळे, संतोष बने, प्रीती सोमपुरा, धर्मेन्द्र झोरे, ओमप्रकाश तिवारी, अयाझ मेमन, आशीष राजे, अजित जोशी, सुधाकर कश्यप आणि अनाहिता मुखर्जी यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.