Saturday 5 July 2014

बारामतीतल्या करामती पत्रकाराचा खेळ लवकरच संपणार!

पुण्याहून सकाळीच निघणाऱ्या एका दैनिकाच्या बारामतीतील बातमीदाराचे अनेक कारनामे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने त्याचा डाव लवकरच संपणार असल्याची खात्रीलायक माहिती बेरक्याला मिळाली आहे. 

हा बातमीदार स्वत:ला सत्ताधाऱ्यांच्या जवळचा असल्याचे भासवून आपले महत्त्व वाढवत असतो. विशेष म्हणजे तो मंत्रीमहोदयांच्या पत्नी चालवत असलेल्या एका एनजीओचाही पदाधिकारी आहे.
सत्ताधाऱ्यांच्या पुढेपुढे करणे हा ह्याचा आवडता उद्योग आहे. त्यांच्यासमोर तो कधीही (मी)लीन व्हायला तयार असतो. याच बळावर तो वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांशी संबंध वाढवतो आणि त्याच्या स्वत:च्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या धंद्यासाठी त्यांचा फायदा घेतो. याच्या पेपरचे बारामतीत ऑफिस असूनही हा आपल्या स्वत:च्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये बसून कारभार हाकतो. त्यामुळे साहाजिकच बातमीदारीकडे त्याचे दुर्लक्ष आहे. 

स्वत:च्या व्यवसायाला अनुकूल अशाच लोकांच्या बातम्या देणे हा त्याचा धंदा आहे. काही विशिष्ट लोकांचा बातम्यांमधून उदो-उदो करून त्यांना बॅंकॉक-थायलंड-पटायाच्या टूरसाठी तयार करतो. आता या तिन्ही ठिकाणी कसल्या टूरसाठी लोक जातात, हे जगजाहीर आहे! त्यामुळेच केवळ अधिकारी, व्यापारी, व्यावसायिक या लोकांच्या बातम्या पाठवाणयचे काम तो करतो. त्यांची खुशामत करण्यात त्याचा वेळ जात असल्याने अनेक चांगल्या बातम्यांकडे तो दुर्लक्ष करतो. एखादा गरीब त्याच्याकडे बातमी घेऊन गेला तर तो त्याची बातमी पाठवत नाही. उलट तुमची बातमी फालतू आहे, असे सांगून त्यांना अपमानित करून पाठवतो. 

यामुळे बारामतीतले बहुसंख्य वाचक या बातमीदारावर आणि त्याच्या सकाळीच निघणाऱ्या पेपरवर प्रचंड नाराज आहेत. या नाराजीचा फायदा घेत लोकांचे मत असलेल्या दैनिकाने उचलून अंकवाढीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. टूरवाल्यावरची नाराजी लोकांचे मत असलेल्या दैनिकाच्या पथ्यावर पडली आहे. एवढेच नव्हे तर हा टूरबहाद्दर बातमीदार इतर पत्रकारांपेक्षा आपणच कसे शहाणे आहोत, आपल्यालाच सगळे कळते अशा आविर्भावात वावरतो. त्यामुळेच तो इतर पत्रकारांना तुच्छ लेखतो. हा ज्या सत्ताधाऱ्यांच्या विश्वासातला असल्याचे भासवतो, त्यांनीच एकदा त्याला जाहीर झालेला एक तथाकथित पुरस्कार देण्यास नकार देत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. 

धंद्याकडेच लक्ष असल्याने याच्याकडून अनेक मोठ्या बातम्या मिस होतात. दुसऱ्या दिवशी सर्व दैनिकांत आलेल्या बातम्या पाहून तो इतर पत्रकारांना मला का नाही बातमी सांगितली राव? असे विचारत रडत बसतो. याच्या अशा सर्व कारनाम्यांमुळे सकाळीच निघणाऱ्या दैनिकाचे नुकसान होत आहे. संपादकाच्या हे लक्षात आले आहे. म्हणून लवकरच या करामती बातमिदाराची उचलबांगडी करण्यात येणार आहे. त्याच्या जागी पर्यायी माणूस शोधण्याचे काम बारामतीत गुप्त पातळीवर सुरू झाले आहे. याची खबरबात अजून त्या 'इंटरन्याशनल' बातमिदाराला नाही.