Monday 28 July 2014

ब्ल्याकमेलर पत्रकारांमुळे पत्रकार व अधिकारी त्रस्त

मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागात येणाऱ्या शिवाजीनगर बैगन वाडी, गोवंडी परिसरात ९० टक्के ब्ल्याकमेलर पत्रकार आहेत.  या पत्रकारांच्या ब्ल्याकमेलिंग मुळे स्वच्छ प्रतिमेच्या पत्रकारांना सुद्धा वृत्तसंकलन करताना त्रासाला सामोरे जावे लागत असून पालिकेचे अधिकारी सुद्धा या ब्ल्याकमेलर पत्रकारांपासून त्रस्त झाले आहेत. 

फक्त सर्वांवर जरब बसावी म्हणून पत्रकाराचे ओळखपत्र असलेल्यांचा सगळीकडे सुळसुळाट आहे. ओळखपत्र असेल तर आपण बिनधास्त कायदा धाब्यावर बसवू शकतो असा त्यांचा गैरसमज असतो. त्या गैरसमजामुळे हल्ली गल्ली बोळातून प्रेस ची कार्यालये आणि पत्रकार दिसून येतात. मुळात सरकारी अधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलणे. त्यांना दमात घेणे ब्ल्याकमेल करणे असे प्रकार हे पत्रकार करत असतात. त्यामुळे खरे पत्रकार जेंव्हा अशा त्रस्त अधिकाऱ्यांना कोणत्याही घटनेची माहिती घेण्यासाठी संपर्क साधतात. तेंव्हा हे अधिकारी त्या पत्रकाराला सुद्धा ब्ल्याकमेलर पत्रकार समजून पूर्ण माहिती देत नाहीत किंवा दडपणाखाली प्रश्नांची उत्तरे देतात. यामुळे खऱ्या पत्रकारांना माहिती मिळवणे त्रासदायक ठरत आहे. 

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाच्या शिवाजीनगर बैगन वाडी, गोवंडी परिसरात ९० टक्के ब्ल्याकमेलर पत्रकार आहेत. त्यांच्यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. उगाच कशाचीही माहिती मागतात. कायदे आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळत असल्याच्या अविर्भावात अर्जामध्येच अमुक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी असा आदेश हि देतात. बहुतेक माहितीचे अर्ज हे झोपडपट्ट्या मधून होत असलेल्या बांधकामा विषयीच असतात. त्यानंतर परिसरातील हॉस्पिटल संदर्भात किंवा महापालिकेच्या सुरु असलेल्या एखाद्या उपक्रमाबद्दल असतात. या विभागात काम करणे खूपच त्रासदायक आहे. ब्ल्याकमेलर पत्रकारांपासून सुटका झाली तर आम्हाला आमचा काम योग्यप्रकारे करता येईल असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.