Tuesday 8 July 2014

दहशत पसरवत खंडणी गोळा करणारा संपादक

Displaying rajaram.jpg
"खबरे आज भी" नामक साप्ताहिकाचा संपादक  राजाराम जैसवाल हा खंडणी वसुलीची कामे करत असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. अश्या खंडणीखोर पत्रकारांमुळे पत्रकारितेचे नाव बदनाम होत आहे. 

एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला संपादक पद मिळालं तर काय होईल याची हि कल्पना न केलेलीच बरी. समाजातील आपली प्रतिष्ठा जपत, प्रामाणिकपणे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे हे लोकशाहीतील या चौथ्या स्तंभाचे काम. आजवरची परंपरा पाहता वृत्तपत्रे समाजहिताची कामे करत आली आहेत. त्यामुळे वृत्तसंस्था कर्मचारी निवडताना योग्य व्यक्तीच निवडते. त्यामुळे गुंड प्रवृत्तींची वर्णी अशा ठिकाणी लागणे केवळ अशक्यच असते. यालाही अपवाद म्हणून कि काय काही स्वयंघोषित संपादक. पत्रकारांची पिलावळ जन्माला येते. साधी २ वाक्य नित लिहता येत नाहीत परंतु त्यांचा वावर गल्ली पासून दिल्लीपर्यंत दिमाखदार असतो. पोलिसांनी अडवले तर त्यालाही कार्ड दाखवून दमात घेण्यापर्यंत यांची मजल जाते. 

असेच एक संपादक महाशय सध्या कलम कि दहशत पसरवून सर्वांना  हैराण करीत आहेत. गरीबाच्या झोपड्यांची डागडुजी सुरु असेल तर त्याच्या ठेकेदाराला दमात घेऊन पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतील. बात नाही बनी तर महापालिकेच्या अधिकार्यांकडे अर्ज करून ते बांधकाम पडायला लावतील. मग तो ठेकेदार नियमित हफ्ता द्यायला सुरु करेल . इथून सुरुवात होते. कोणाला म्हणून माफी देत नाहीत हे संपादक महाशय फक्त पैसे घेऊन मंदावली करतात. ' खबरे आज भी ' नामक साप्ताहिक RNI : MAHHIN/2010/31660 या क्रमांकाने नोंद केलेली आहे. म्हणायला हे साप्ताहिक आहे पण खरंतर ते अनियतकालिक आहे. कधीही प्रकाशित होण्याची शक्यता असते. जेंव्हा कुणाकडून भरघोस मलई येते किंवा कोणाकडून काही केल्या काही मिळत नाही तेंव्हा त्याची बदनामी करण्याकरता प्रकाशित होते. कधी कधी ६ महिने अंक सुद्धा येत नाही. त्यातल्या बातम्या हि सगळ्या इकडून तिकडून चोरलेल्याच असतात. त्यांचं कार्यालय कामोठे ला आहे असं म्हणतात पण ते कधीच उघडं  नसतं. 

Displaying rahul tiwari.jpg
त्यांचा कर्मचारी वर्ग म्हणाल तर अक्षता वाटल्यासारखे त्यांनी ओळखपत्र पैसे घेऊन वाटली आहेत. एका मिसरूड सुद्धा न फुटलेल्या अल्पवयीन राहुल तिवारी नावाच्या मुलाला छायाचित्रकार असल्याचे ओळखपत्र बहाल केले आहे. मुळात राहुलचं  काम हफ्ते गोळा  करणे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून सेटिंग लावणे इतकंच  आहे. असे उद्योग करून संपादकांनी बरीच माया जमवली आहे. काळे धंदे करणारे सगळे त्यांच्यापासून त्रस्त आहेतच परंतु पोलिस, महापालिकेचे अधिकारी विविध प्रशासकीय अधिकारी त्रस्त आहेत. मात्र यांच्यामुळे पत्रकारिता बदनाम होते आहे. जनतेचा पत्रकारांवरील विश्वास संपत आहे हे मात्र नक्की. 

संपादक महाशायांवर खंडणीचे २-३ गुन्हेही न्यायप्रविष्ठ आहेत. ४ था गुन्हा त्यांनी मॉणेज केल्यामुळे दाबला गेला आहे . त्यांचं  वृत्तपत्र stall वर क्वचितच मिळतं. पण पोलिस ठाणे , महापालिकेचे बांधकाम अधिकारी यांच्या टेबलावर मात्र नक्की मिळेल. असंख्य चुकांनी भरलेलं हे वृत्तपत्र नाईलाजाने अधिकारीही वाचतात पण ते सुद्धा आपली बातमी आहे का ते पाहण्यासाठी.