Tuesday 9 September 2014

संपादकांची अदला बदल सुरु.....

महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील संपादकांची अदला बदल सुरु झाली आहे. प्रहार वृत्तपत्राचा महेश म्हात्रे यांनी राजिनामा दिल्या नंतर प्रहारला कोणीही संपादक मिळत नव्हते. सध्या जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना संपादक पदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दबंग दुनिया हिंदी दैनिकाच्या संपादक पदी अभिलाष अवस्थी यांना संपादक बनवण्यात आले आहे. 


मधुकर भावे हे काँग्रेसचे निकटवर्ती मानले जातात. भावे यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या दर्डा परिवाराच्या लोकमतचे संपादक पद भूषवलेले आहे. दबंगचे अभिलाष अवस्थी हे सुद्धा काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंग यांचे जवळचे आहेत. 'वर्ल्ड ऑफ प्रियंका' नावाच्या नियतकालिकाचे ते संपादक राहिले आहेत. अवस्थी १ सप्टेंबर पासून कामावर रुजू झाल्यानंतर दबंगला काँग्रेसमय करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. गुटका किंग वाधवानी यांच्याकडून जुन्या पत्रकारांना नोकरीवरून काढण्यासाठी दबाव आणला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई आवृत्तीचे संपादक नीलकंठ पराडकर यांची जबलपूर येथे बदली करण्यात आली आहे. हिंदी वृत्तपत्रांमधील महानगर आणि नवभारत आधी पासूनच काँग्रेस समर्थक आहेत. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांचे काँग्रेसीकरण केले जात आहे अहि चर्चा सध्या सुरु आहे.