Saturday 3 October 2015

प्रहार, पत्रकारांना धमक्या, मी मराठी अपडेट

नाही म्हणता 'प्रहार' सध्या जवळपास सहा वर्षांचा कालावधी पूर्ण करत आहे. या सहा वर्षांच्या काळात कोणतीही ठोस कामगिरी प्रहारने दाखवली नाही. आजमितीला प्रहार शेवटच्या घटका मोजत आहे. त्याचा खप सध्या दोन ते तीन हजारांच्या आसपास असल्याचे अगदी खात्रीलायक वृत्त आहे. जाहिरातीही फार नाहीत. ज्या काही जाहिराती मिळतात त्या केवळ सरकारी असतात. नारायण राणे यांना खूष करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढूनताणून टीका केली जाते, आणि याच पानावर नरेंद्र मोदी यांचा हसरा फोटो असणारी अर्धापान जाहिरातही प्रसिद्ध केली जाते. हा दुटप्पीपणाच आहे.
 
शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधूनही तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर टीका केली जायची, मात्र  त्यांच्या जाहीरातीही वेळ पडल्यास नाकारल्याही जायच्या. मात्र प्रहारसारखा ढोंगीपणा सामनाने कधीही दाखवला नाही. एकंदरीतच प्रहार शेवटची घटका मोजत आहे, हे मात्र नक्की. आता हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात पहिल्या पानावर सलग दोन दिवस प्रसिद्ध होईल, मात्र प्रत्यक्षात भरती काही होणार नाही, हे निश्चित.……

पुण्यनगरीच्या मलमेंना सध्या नक्षलवाद्यांची धमकी आली आहे म्हणे. ज्या संपादकाने कधी कागदाला पेन लावला नाही, त्याला थेट नक्षलवाद्यांकडून धमकी? दररोज रात्री अंकामध्ये किती फोटो बामणेंनी लावून घेतले, याचा दररोज हिशोब घेणारा हा माणूस, याला धमकी.  सध्या पत्रकारांनाही जणू धमक्यांचे पेवच फुटले आहे. आयुष्यभर पुचाट पीआर कम बातमीदारी करणाऱ्यांना धमक्या. कोणीही याव पोलिस स्टेशनला पत्र द्यावे, आणि संरक्षण हवे, म्हणून मागणी करीत प्रसिद्धी मिळवावी. या अशा ढोंगी पत्रकारांमुळे खरोखर धमकी मिळणाऱ्यांची गोची होऊन बसणार आहे.………

मी मराठीमध्ये काही अंतर्गत बदल केले आहेत . स्वप्नील सावरकर सध्या राजकीय टीमसह लीड करणार आहेत, तर त्यांच्या जागी निनाद सिद्धये चीफ रिपोर्टरपद सांभाळत आहेत.…….