Monday 15 September 2014

"तरुण भारत"ची मुंबई आवृत्ती बंद पडण्याच्या मार्गावर

बेळगाव वरून प्रसिद्ध होणाऱ्या तरुण भारतची काही महिन्यांपूर्वीच मुंबई आवृत्ती सुरु करण्यात आली होती. तरुण भारतची ही आवृत्ती नावारूपाला येण्या अगोदरच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वृत्तपत्राच्या मुंबई येथील आवृत्तीची जबाबदारी असलेल्या कोठेकर आणि काळे यांच्याकडून होत असलेल्या जाचामुळे पत्रकार आणि कर्मचारी नोकऱ्या सोडून जात असल्याने लवकरच हि आवृत्ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

तरुण भारतची मुंबई आवृत्ती सुरु झाल्या पासून एकही शब्द न लिहिणाऱ्या आणि किरण ठाकूर यांच्या लोकमान्य बँक व सिटीलाईट थियेटरचे कामकाज बघणाऱ्या नरेंद्र कोठेकर यांना या आवृत्तीचे निवासी संपादक बनवण्यात आले आहे. तर मंत्रालयात शिवसेना आणि भाजपाची बीट दिलेल्या परंतू नुसत्या टीव्ही वर बसून बातम्या बनवणाऱ्या प्रवीण काळे यांना चिफ रिपोर्टर बनवण्यात आले आहे. एक न लिहिणारा आणि एक टीव्ही वर बसून बातम्या बनवणारा पत्रकार तरुण भारतची मुंबई आवृत्ती चालवत आहेत. यामुळे तरुण भारतचे नाव रसातळाला पोहोचवण्याचे काम या दोघांकडून केले जात आहे.

चिफ रिपोर्टर बनल्यामुळे डोक्यात हवा घेलेल्या प्रवीण काळे यांनी तर फतवे काढायला सुरु केली आहे. पत्रकारानी बीटवर न फिरता कार्यालयात संध्याकाळी ५ च्या आत यावे आणि टीव्ही वर बसून बातम्या बनवाव्यात असा एक फतवा काळे यांनी काढला आहे. या फतव्यामुळे पत्रकारांच्या बातम्या चुकत असल्याने परत पत्रकारांनाच ओरडा खावा लागत आहे. काळे यांनी आपल्या मर्जीतील अमोल राऊत, सुजाता सोरटे, सुकन्या सावंत, अपूर्वा सावंत यांचा एक गट तयार केला आहे. या लोकांना सोडल्यास इतर सर्वांचा मानसिक छळ केला जात आहे.

महेश पांचाळ सारख्यांनी मुंबई आवृत्ती चांगली चालावी म्हणून उपनगर हे पण चालू केले तर त्यांच्यावर पैसे खातात असा आरोप केला गेला आहे. प्रेमानंद बच्छाव सारख्या मंत्रालयातील जुन्या अनुभवी पत्रकारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. पांचाळ आणि बच्छाव यांच्यासारखे अनुभव प्रत्तेक पत्रकार आणि कर्मचारी घेत आहे. कोठेकर यांच्या तक्रारीमुळे वितरण विभागातील गामा यांना नुकतेच नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. कोठेकर आणि काळे यांच्या छळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे आतापर्यंत सहा पत्रकार आणि कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडून दिल्या आहेत. इतर कर्मचारी सुद्धा लवकरच आपल्या नोकऱ्या सोडून देण्याच्या मार्गावर आहेत.

कोठेकर आणि काळे यांच्याकडून छळ होत असल्याबाबत तरुण भारतचे मालक किरण ठाकूर यांचे चिरंजीव प्रसाद ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या असल्या तरी त्यांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. छळ करणाऱ्या कोठेकर आणि काळे यांच्यावर कारवाही करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनाच साभाळून घ्या असे सांगितले जात आहे. यामुळे कोठेकर आणि काळे यांचे चांगलेच फावले आहे.