Friday 25 July 2014

महिला पत्रकाराचा रहस्यमय मृत्यू

उत्तरप्रदेश / गाजियाबाद - वैशाली नगर, सेक्टर ५ मध्ये मिलिता दत्ता मंडल या महिला टीव्ही प्रोड्यूसरचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. हि टीव्ही पत्रकार महागून सोसायटी मध्ये आपल्या पती सोबत राहत होती. ती दिल्ली येथील एका सरकारी च्यानल साठी काम करत होती. २१ जुलैला ती रात्री ११ वाजता घरी पोहोचली होती. आपल्या घरातील बाल्कनी मध्ये उभी असताना ती अचानक बाल्कनी मधून खाली पडली. तिच्या पतीने तिला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक पोलिस हि हत्या आहे कि आत्महत्या याचा तपास करत आहेत.