Sunday 4 January 2015

पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

11 जानेवारी रोजी सर्व माध्यमातल्या पत्रकारांसाठी टी. व्ही. जर्नालिस्ट असोशिएशननं संपूर्ण बॉडी चेकअप शिबिराचं आयोजन केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स असो कि प्रिंट, हिंदी असो की मराठी किंवा सर्व भाषिक पत्रकार, वत्तवाहिन्यात, न्युजपेपरमध्ये काम करणारे कोणीही यात सहभागी होउ शकतात. आपण स्वतः, आपली पत्नि, आई वडील यांच्या चेकअपसाठी हे शिबिर होणार आहे. 

प्रेस कल्ब, मुंबई मराठी पत्रकार संघ, महानगरपालिका पत्रकार संघ, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोटर्स, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे सर्व सदस्य, किंवा मुंबई किंवा राज्यातले कोणीही पत्रकार या शिबिराचा लाभ घेउ शकतात. नामांकित डॉक्टरकडून पत्रकारांची तपासणी होणार आहे. त्याची फाईल बनवली जाईल. आणि काय काळजी घ्यायला हवी याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी खालीली ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन टीव्हीजेएचे अध्यक्ष विलास आठवले यांनी केले आहे. 
नाव नोंदवण्यासाठी 
झायनोवा रुग्णालय- 42700600, 25155599 
किंवा 
सागर सोना - कार्यालयीन कर्मचारी टीव्हीजेए - 8898636476

शिबिराचे ठिकाण / वेळ 
 टी. व्ही. जर्नालिस्ट कार्यालय, पत्रकार संघ - प्रेस क्लब जवळ आझाद मैदान
सकाळी 10 ते 5