Sunday 4 January 2015

मुंबईत पत्रकारांसाठी कार्यशाळा

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने दोन दिवसीय कार्यशाळा 6 व 7 जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील कुर्ला कोर्टाजवळ असलेल्या मंडळाच्या संकुलात आयोजित केली आहे.या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2015 या दिवशी सकाळी 10 वाजता होईल.


कार्यशाळेत आधुनिक पत्रकारितेतील आव्हानं, श्रमिक पत्रकारांची सद्यस्थिती व आव्हानं, पत्रकार संरक्षण कायदा, संघटनात्मक बांधणीची आवश्यकता तसेच पत्रकारांसाठी सवलत व योजनांची माहिती आदींचे मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रसारमाध्यमांतील नामांकित तजांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यशाळा निशुल्क असून त्यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कर्मचारी, वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुक्त पत्रकार, बिनतारी व संकेतस्थळ प्रसारमाध्यम प्रकारातील प्रतिनिधी यांचा सह्भाग असणार आहे. 
अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा 
-  अण्णासाहेब देसाई, अध्यक्ष – भारतीय पत्रकार संघ, संपर्क – 9422680912
-  भारतीय पत्रकार संघ (रजि.) संलग्न भारतीय मजदूर संघ
-  कार्यालय : इब्राहिम मॅन्शन, दुसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,परळ, मुंबई 400012
- दूरध्वनी  9422680912, 8898189114, 8655181988
ई मेल - bpatrakarsangh@gmail.com