Thursday 16 April 2015

तरुण भरतच्या दिव्या खाली अंधार - 7 महीने काम पगार मात्र शून्य

आज पर्यंत तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील पण ही बातमी वाचून तुम्हाला पत्रकार होण्याची लाज वाटेल मराठी माणसाच्या हितासाठी अनेक पक्ष लढत आहे पण मराठी पत्रकारांचे काय ? कोण लढणार यांच्यासाठी ? आता तुम्हला 'तरुण भरत'च्या  मुंबई ऑफिसमधील काही सत्य घटना एकूण मराठी माणसाचा आणि मराठी पत्रकार संघटनाचे रक्त पेटून उठेल पण ते ऐकतील आणि विसरून जातील हे मी दाव्याने बोलू शकतो. 

तरुण भरतची मुंबई आवृति येऊन दीड वर्ष झाले. सीईओ आणि डेस्क इंचार्ज यांनी मुलाकती घेतल्या आणि तुम्ही उद्यापासून रुजू व्हा आम्ही पगारबाबत तुम्हाला नाराज नाही करणार असे सांगण्यात आले. मात्र पुढे एकमहिना झाल्यानंतर रेल्वेम्हाडासांस्कृतिक बीट करणाऱ्या पत्रकारांना ते साडे चार हजार' पगार देण्यात आला आणि तुम्हाला प्रत्येक 6 महिन्यात पगार वाढ करुन 12 हजार होणार असल्याचे सांगण्यात आलेपण 6 महिन्यात केवळ 500 रूपये पगार वाढ झाल्याने पत्रकार आक्रमक झालेफिरायला खिशात पैसे नसल्यामुळे काही पत्रकारांनी फक्त कार्यालयातून काम करण्याचे ठरविलेत्याचप्रमाणे 2 पत्रकारानी बाहेर काम  मिळाल्याने आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेहे व्यवस्थापनला कळताच  पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत प्रकरण मिठविण्याचा प्रयत्न केला.

एका पत्रकाराला रेल्वे स्टेशन मधून घरी जायला पैसे नसायचे तेंव्हा तो रोज 3 किमी चालत घरी जात असे आणि  कधी कधी चालताना डोळ्यात पानी देखील येत असेएवढा सगळ होत असताना त्या पत्रकारांनी तेथील जुन्या पत्रकारना सांगितलेमात्र जुने पत्रकार हे मुंबई मधील पत्रकार संघटना प्रमाणे आम्ही बघू - करू असे आश्वासन देत. अशी प्रकरणे थांबवण्यासाठी किमान वेतन कायदा हवा अन्यथा शेतकऱ्यांसोबत पत्रकारांच्या आत्महत्याचे प्रकार घडतील.

महीने काम पगार मात्र शून्य
एका तरुण शिकाउ पत्रकारने तेथे 7 महीने काम केलेविधानसभा निवडणुकीच्या अनेक सभाचे वार्ताकंन त्या  शिकाऊ पत्रकारने केले आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या तरुण पत्रकारला तुम्ही इथे कोणत्याही वस्तुला हात लावयचे नाही असा फतवा काढत त्याला एक रुपयासुद्धा न देता त्याला घरी जाण्यास सांगितले.