Sunday 20 July 2014

बातम्या लावल्या म्हणून पत्रकारावर गोळ्या झाडल्या

पंजाब मलोट (गोयल) : स्थानिक वृत्तपत्रात एक बातमी लावल्याने पत्रकार शाम जुनेजा व वैद्य गुरबचन सिंग यांच्या मध्ये भांडण होऊन सिंग याने पत्रकारावर गोळ्या चालवल्याने पत्रकाराला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

गुरबचन सिंग याचा गावठी औषधे बनवण्याचा धंदा आहे. पत्रकार शाम जुनेजा याने या औषधांविरोधात बातमी लावली होती. या भांडणा मध्ये सिंग याने जुनेजा याच्या कार्यालयात जाऊन बंदुकीची गोळी चालवली.यामधून पत्रकार जुनेजा हे आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. रुग्णालयात भारती झालेल्या पत्रकाराने डीसीपी मनविन्द्रबीर सिंग यांची भेट घेवून घटनेची माहिती दिली आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या सिंग याने हा पत्रकार माझ्या विरोधात सतत बातम्या लावत होता. तहसील रोड वर आम्ही समोर समोर आला तेव्हा आमच्या मध्ये बोलणे झाले यामधून वाद निर्माण होऊन भांडण झाले. त्याने फक्त हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आहेत असे महटले आहे. 
खबर को लेकर झगड़े में पत्रकार पर चलार्इ गोली