Thursday 23 January 2014

बार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना अटक

बार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. तुषार कथारीया आणि वसिम खान अशी या पत्रकारांची नवे असून हे दोघे बॉम्बे प्रेस या साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. 
धोबी तलाव परिसरात अशोक शेट्टी व संतोष शेट्टी यांच्या मालकीचा  "क्रॉस रोड" नावाचा बार आहे. तुषार कथारीया आणि वसिम खान यांनी अशोक शेट्टी यांच्याकडे २६ जानेवारीच्या वृत्तपत्रात २५ रुपयांची जाहिरात आणि दरमहा २५ हजार रुपये हफ्ता न दिल्यास बार मधील अवैध धंद्याची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याची धमकी दिली होती. यावेळी बार मालक आणि पत्रकार यांच्यामध्ये बाचाबाची व शिवागाळ झाली होती. याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवल्या नंतर या दोन्ही पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या दोन्ही पत्रकारांना कोर्टात हजार केले असता त्यांना २४ जानेवारी पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.