Saturday 15 June 2013

पत्रकारांमधील गटबाजी भोवली

त्रकारांमधील गटबाजीमुळे पत्रकारांचे कुठलेच विषय मार्गी लागत नाहीत हा आपल्याकडचा अनुभव.गटबाजी आणि खेकड्याच्या वृत्तीचा फटका पत्रकारांच्या अनेक चळवळींनाही बसतो.त्याचेही अनेक उदाहरणं देता येतील.मात्र हे सारं मराठी प्रांतातच चालतं असं नाही.राजस्थानमध्ये पत्रकारांमधील अशाच गटबाजीचा फटका पत्रकारांनाच बसला आहे.राजस्थान सरकारने  उदयपूर मधील 101 पत्रकारांना प्लॉट दिले होते.मात्र या प्लॉटचे वाटप करताना अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करीत काही जण न्यायालयात गेले.आता न्यायालयाने प्लॉट वितरण प्रक्रियाच स्थगित केली आहे.आता या प्लॉटचं पुन्हा वितरण होणार आहे.म्हणजे तेल ही गेले आणि तूप ही गेले अशी अवस्था पत्रकारांची झाली आहे.पत्रकारितेला असलेला हा गटबाजीचा शाप कसा दूर करायचा याचा विचार सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन केला पाहिजे.