Saturday 21 June 2014

चॅनलच्या प्रमुखांना तरुणी दिली भेट - प्रकरणाची चौकशी सुरु


sssssssssss

दक्षिण आफ्रिकेच्या एका चॅनलच्या प्रमुखांना चक्क एक तरुणी, एक गाय आणि तिचे कोकरू भेट म्हणून देण्यात आले आहे. या प्रकारांची चोकशी करण्याची मागणी स्थानिक महिला संघटनांनी केल्यावर स्थानिक सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. 
दक्षिण आफ्रिकेतली साऊथ आफ्रिकन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन चे कार्यकारी प्रमुख हलाऊदी मोत्सोएनेंग यांना हा अजब नजराणा मिळाला आहे. एका स्थानिक कबिल्याच्या प्रमुखाने ही अनोखी भेट दिली आहे. महिला संघटनांनी या विरोधात आवाज उठवत रस्त्यावर उतरायला सुूरूवात केलीय. त्यानंतर या प्रकऱणाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी मिळाल्या असून आरोपीची चौकशी केली जाईल असं सरकारच्या प्रवक्त्यांनं सांगितलं.

सोवेतान नावाच्या स्थानिक वृत्तपत्राने मागच्या आठवड्यात ही बातमी छापली होती. या बातमीनुसार लिंपोपा विभागात थोहोयांदाऊ येथे ही घटना घडली. वेंदा कबिल्याच्या प्रमुखाने १० तरूण मुलींना एका रांगेत उभे करून मोत्सोएनेंगा यांना यातून एकीची निवड करा असे सांगितले. त्यानी २२ वर्षाच्या एका मुलीची निवड केली. ही मुलगी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अभ्यास करतेय. बातमीमध्ये असेही म्हटले आहे की, निवडली गेलेल्या मुलीने नंतर मोत्सोंएनेंगा यांच्या बरोबर छायाचित्रही काढले आहे.