Friday 27 December 2013

कंत्राटदाराच्या पैश्यांवर पालिकेतील पत्रकार निघाले शिरपूर दौऱ्यावर

27 /12 / 2013
मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणारे पत्रकार शुक्रवार २७ ते ३० डिसेंबर पर्यंत शिरपूर येथील दौऱ्यावर निघाले आहेत. मुंबईमधील पत्रकारांना शिरपूर प्याटर्ण दाखवण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.पालिका वार्ताहर संघाच्या दोन पदाधिकाऱ्यानी जनसंपर्क अधिकाऱ्याकडे आम्हाला गेले काही वर्षे पिकनिकला नेले नाही, या वर्षी तरी कोणाकडून तरी खर्चाची सोय करून घेवून पिकनिकला घेवून चला अशी मागणी केली होती.वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणी प्रमाणे जनसंपर्क अधिकाऱ्याने एका कंत्राटदाराला हाताशी धरून हा दौरा आयोजित केला असल्याचे समजते.

शिरपूर मध्ये जमिनीमध्ये चर खोदून १२ महिने पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे शिरपूर प्याटर्ण प्रसिध्द झाला आहे. मुंबई मधील पत्रकारांना याचा उपयोग काय, मुंबईमध्ये पाईपलाईनने पाणी पुरवठा होतो, जिथे पाणीपुरवठा होत नाही तिथे अफाट पैसा घेवून ट्यांकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मुंबई मध्ये पुण्याला लागते इतके पाणी चोरी होते. अशा परीस्ठीमध्ये पाणीचोरी रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत दौरा असता तर समजले असते परंतु शिरपूर प्याटर्ण मुंबई मध्ये कुठेही राबवता येणार नसतानाही अभ्यास दौऱ्याचे नाव देवून कंत्राट दाराकडून पैश्याची सोय करून पत्रकारांना खुश करण्यासाठी पिकनिक नेण्याचा घाट घातला गेला आहे. 

या दौऱ्याला खास करून जनसंपर्क अधिकार्याच्या विरोधात गेलो तर आपल्या वृत्तपत्राच्या जाहिराती बंद होतील अशी भीती बाळगून जनसंपर्क अधिकाऱ्याची हाजी हाजी करणारे, स्थायी समिती अध्यक्षांच्या द्वारे पाकीट मिळणारे, काही गटनेते आणि नगरसेवकांकडून बातमी छापून आल्यावर पैशांसाठी हात पसरणाऱ्या पत्रकारांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे.यामुळे पालिकेमध्ये सध्या कंत्राटदाराच्या पैश्यांवर निघालेल्या पिकनिकची चर्चा होत असून शिरपूर प्याटर्ण मुंबई मध्ये कुठेही लागू होणार नसताना अशा अनावश्यक दौर्यांच्या नावे पिकनिक काढण्याची आवश्यकताच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.