Friday 7 February 2014

संघाचा भांडाफोड केल्याने 'CARAVAN' मासिकाला धमक्या


संघाचा भांडाफोड केल्याने 'CARAVAN'ला धमक्या, ऑफिसबाहेर RSSचे आंदोलन

नवी दिल्ली- समझौता बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदने CARAVAN या मासिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर हे प्रकरण आता गाजायला सुरुवात झाली आहे. असीमानंदने याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले, आहे की त्याने CARAVAN मासिकेला कोणतीही मुलाखत दिलेली नाही. दुसरीकडे, या मुलाखतीचे पडसाद उमटू लागले आहेत.
संघाचा या स्फोटामागे हात असल्याचे CARAVANने म्हटल्याने त्यांच्या दिल्लीतील ऑफिसबाहेर आरएसएस आणि हिंदू सेना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या मासिकाच्या दिल्ली व मुंबई कार्यालयातही धमकीचे फोन येत आहेत. CARAVAN चे संपादक विनोज जोज यांनी टि्वट केले आहे की, CARAVAN च्या दिल्ली आणि मुंबई ऑफिसमध्ये धमक्या देणार फोन येत आहेत.

CARAVAN च्या फेब्रुवारीच्या अंकात एक मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात असीमानंदने म्हटले आहे, की समझौता स्फोट संघप्रमुख मोहन भागवत यांच्या सहमतीने घडविले होते. 2006 ते 2008 या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादच्या मक्का मशिदीत, अजमेरमच्या दर्ग्यात व मालेगावमध्ये दोन वेळा असे एकून 5 वेळा स्फोट घडविले होते.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, असीमानंद आता म्हणत आहे, की एक पत्रकार वकीलाच्या वेशात त्याला भेटण्यासाठी कोर्टात आला होता. आमच्यात जे काही बोलणे झाले त्याची एक हस्तलिखीत नोटसुद्धा आहे. असीमानंदने म्हटले आहे, की मी कधीही मोहन भागवत यांचे नाव घेतले नाही. दुसरीकडे, CARAVANचे संपादक विनोद जोज यांनी म्हटले आहे की, CARAVANमध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत सत्य असून, मासिक लवकरच असीमानंदसोबत झालेल्या चर्चेचे ऑडिओ टेप्स रिलिज करेल. तसेच CARAVANचा कोणताही पत्रकार वकीलाच्या वेशात असीमानंदला भेटायला गेला नव्हता. तसेच ही मुलाखत म्हणजे स्टिंग ऑपरेशन प्रकारातली नाही. तर, खुद्द असीमानंदनेच CARAVANला बोलण्याची तयारी दाखवली होती.
संघाचा भांडाफोड केल्याने 'CARAVAN'ला धमक्या, ऑफिसबाहेर RSSचे आंदोलन
CARAVAN या मूळच्या ब्रिटिश मासिकाने तब्बल 2011 ते जानेवारी 2014 या दरम्यान असीमानंदची 4 वेळा भेट घेऊन त्याला बोलते केले. असीमानंदच्या हवाल्याने या महिन्याच्या अंकात त्याची एक मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे, की सध्या सरसंघचालक म्हणून कार्यरत असलेले मोहन भागवत 2005 मध्ये संघाचे सरचिटणीस होते. त्यावेळी इंद्रेश कुमार, सुनील जोशी यांच्यासह भागवत यांच्याशी माझी भेट झाली होती. त्या भेटीत काही तरी धमाका झाला पाहिजे अशी कल्पना सुनील जोशीने मांडली. त्यास भागवतांनी लागलीच संमती दिली. त्यावेळी भागवत आणि इंद्रेश यांनी मला हे काम पुढे नेण्यास संमती दिली.
  
त्यानुसार सर्वप्रथम सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये स्फोट करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी 2007 मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये स्फोट, मे 2007 साली हैदराबाद मक्का मशिदीत स्फोट, ऑक्टोबर 2007 मध्ये अजमेर दर्ग्यात तर पाचव्यांदा पुन्हा एकदा मालेगावमध्येच सप्टेंबर 2008 साली पाच साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यात 119 लोक मृत्यूमुखी पडले होते तर 80 पेक्षा जास्त जखमी झाले होते.

या स्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने केला होता. त्यानुसारच स्वामी असिमानंदसह काही जणांना अटक करण्यात आली होती. असीमानंद सध्या अंबाला येथील तुरुंगात आहे. येथेच कॅरावन मासिकाच्या प्रतिनिधीने असीमानंदची मुलाखत घेतली आहे. त्यासाठी या प्रतिनिधीने दोन वर्षे सतत असीमानंदच्या संपर्कात राहून विश्वास संपादन केला व त्याच्याकडून सत्य काढून घेतले आहे.