Monday 17 March 2014

मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करणारे आसाम टि्‌‌रब्युन पहिले वृत्तपत्र

आसाम ट्रिव्युन या इंग्रदी दैनिकाचे आभार मानावे लागतील. पत्रकारांच्या वेतन निश्छितीसाठी नेमण्यात आलेल्या मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करणारे ते देशातील पहिले वृत्तपत्र ठरले आहे. नवी वेतनश्रेणी लागू केल्याने आसाम टि्‌‌रब्युनमधील कर्मचारी आणि पत्रकारांच्या वेतनात 15,000 हजार रूपयाचे मासिक वृध्दी झाली आहे.

वृत्तपत्राचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेने आपसात चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला आहे.आसाम ट्रिब्युनमध्ये 400च्यावर कर्मचारी आहेत.त्यातील 100 पत्रकार आहेत.पुर्वांचलचे ते सर्वात मोठे इंग्रजी दैनिक मानले जाते.आश्चर्य याचे वाटते की,आसाम ट्रिब्युनसारखे एक छोटे वृत्तपत्र जर मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून आपल्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक मनोबल वाढवू शकते तर स्वतः सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणवून घेणारी वृत्तपत्र या आयोगाच्या शिफारशी लागू कऱण्यात टाळाटाळ का करीत आहेत.