Wednesday 18 June 2014

केंद्र सरकार करणार पत्रकार संरक्षण कायदा

पत्रकार सुरक्षा कायदा करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली असून हा कायदा लवकरात लवकर कऱण्याचा पुनरूच्चार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली समितीच्या एका शिष्टमंडळाने प्रकाश जावडेकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकारांवर हल्ला होत असताना आणि राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे सरकारकडे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करीत असतानाही राज्य सरकारने त्याबाबत टोलवा टोलवी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकर यांनी माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री म्ङणून सूत्रे हाती घेताच पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा केंद्र सरकार करणार असल्याचे सूतोवाच केले. त्यामुळे हा कायदा देशभर लागू होईल आणि देशभरातील पत्रकारांना कायद्याचे संरक्षण मिळेल. जावडेकर यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने त्यांना खास धन्यवाद देत हा कायदा लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या कायद्याबरोबरच देशातील निवृत्त पत्रकारांना केंद्र सरकारने निवृत्ती वेतन द्यावे अशीही मागणी जावडेकर यांच्याकडे केली आङे. जावडेकर यांनी यावर विचार कऱण्याचे आश्वासन दिले आहे.