Wednesday 30 July 2014

"सकाळ" ने ईदच्या सुट्टीच्या दिवशी पालिकेत मांडला ठराव

२९ जुलैला रमजान ईद निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. तशीच मुंबईच्या महापालिकेला सुद्धा सुट्टी होती. परंतू दैनिक "सकाळ" ने "ऍसिड विकत घेणाऱ्यांची नोंदणी हवी" या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमी मध्ये "ऍसिड हल्ल्यांना आळा घालायचा असल्यास ते विकत घेणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी होणे बंधनकारक करण्याचा ठराव मंगळवारी (ता.29) महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आला" असे म्हटले आहे. यामुळे सकाळच्या पत्रकाराने सर्वाना ईदची सुट्टी असताना पालिका सभागृहामध्ये ठराव मांडला अशी बातमी कशी दिली ? बातमी देणारा हा पत्रकार शुद्धीवर होता का ? बातमी तपासून लावणारे उपसंपादक झोपेत होते का? त्यांना २९ जुलैला ईद ची सुट्टी होती हे माहित नव्हते का ? असे कित्तेक प्रश्न वाचकांकडून उपस्थित केले जात आहेत. 


सदर बातमी सकाळच्या ऑनलाईन आवृत्ती मध्ये खालील लिंक वर आहे