Sunday 10 August 2014

पत्रकारांना वेगळा संरक्षण कायदा कशाला हवा - जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी

पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपली जात पंथ बाजूला ठेवून काम केले पाहिजे असे आव्हान करताना पत्रकारांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला आहे. कोणावर काही अन्याय अत्याचार झाल्यास भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करता येतो मग पत्रकारांसाठी वेगळा कायदा कशाला हवा, पत्रकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत नाहीत का असे प्रश्न उपस्थित करून पत्रकारांना वेगळा संरक्षण कायद करण्यास आपला विरोध आहे असे स्पष्ट मत जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी 'जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र'च्या मीरा रोड येथे आयोजित पत्रकार मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.  

मराठी प्रमाणेच इतर भाषिक वृत्तपत्रांमध्ये इंगर्जी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने आअज वृत्तपत्रांमध्ये भिसळ झाली आहे. आज कोणतीही वृत्तपत्र आपल्या स्वताच्या भाषेत प्रसिद्ध होत नाहीत याची खंत त्रिवेदी यांनी व्यक्त केली. 'जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र' हि संघटना ट्रेड युनियन कायद्यानुसार नोंदणीकृत अशी संघटना आहे. पत्रकारांना खऱ्या अर्थाने आपले न्याय हक्क मिळवून देणारी संघटना आहे. यामुळे संघटना ज्या प्रकारे काम करत आहे त्याचे त्रिवेदी यांनी यावेळी अभिनंदन केले.  

जो पत्रकार प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करतो तो पत्रकार नक्की यशस्वी होऊ शकतो. पत्रकारिता हा अतीसंवेदनशील व बुद्धिमान क्षेत्रातला व्यवसाय आहे परंतू काही लोकांनी त्याचा धंदा केला आहे. आज पत्रकारांची विश्वासहर्ता लोप पावली आहे. पत्रकारितेमध्ये संशोधनाचा अभाव निर्माण झाला आहे यामुळे नितीमुल्य पाळून कोणत्याही आमिषांना भुलून पत्रकारांनी बातम्या देवू नये असे बेस्टचे उप जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले. पत्रकारांनी बातमी देताना शहानिशा करून, घाई गडबड न करता बातमी द्यावी. ब्रेकिंगच्या नावाने धुमाकूळ घालू नये असे आव्हान वराडे यांनी केले. 

युनियनच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश साटम व मीरा भाईंदर युनिटचे अध्यक्ष नामदेव काशीद यांच्या नेतृत्वा खाली संपन्न झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला युनियनचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ, जेष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील, हेमंत सामंत, मुंबई जिल्हा अध्यक्ष अजेयकुमार जाधव, मुंबई महानगर पालिका युनिटच्या अध्यक्षा राधिका यादव, डॉ. आसिफ शेख, मीरा भाईंदर महानगर पालिकेतील उप महापौर नूरजहा हुसेन, विरोधी पक्ष नेते नरेंद्र मेहता, उद्योगपती विरल व्यास, राजेश पटेल, निमेश शहा, नगरसेविका दिप्ती भट, रेखा विराणी, चंद्रकांत मोदी, विक्रम प्रताप, गिरा व्यास इत्यादी मान्यवर उपस्थित होते.