Wednesday 17 September 2014

अमर उजाला मधील पत्रकारांची फसवणूक

अमर उजाला ग्रुप मध्ये काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचाऱ्यांना पाच महिन्या पूर्वी एक इ मेल पाठवण्यात आला ज्यामध्ये मजिठीया आयोगाच्या शिफारशी नुसार रात्र पाळीमध्ये काम करणाऱ्यांना मे महिन्याच्या वेतनासह रात्रपाळी भत्ता देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु चार महिने झाले तरी अद्याप हा भत्ता देण्यात आला नसल्याने अमर उजालाने पत्रकारांची खुले आम फसवणूक केली आहे. 

पत्रकारांच्या वेतनाबाबत मजिठीया आयोगाच्या शिफारशी लागू करणारी अमर उजाला हि पाचवी कंपनी असे जाहीर करण्यात आले असले तरी काही शे रुपयेच वाढवून देण्यात आले आहेत. पत्रकारांना दरवर्षी मिळणारे इंक्रीमेंट आणि प्रमोशन रोखून ठेवून पत्रकारांच्या करिअर बरोबर खेळ करण्यात आला आहे. पत्रकार इतरांवर अन्याय झाल्यावर त्यांना न्याय मिळवून देत असले तरी स्वतावर अन्याय होताना मात्र त्यांना मुग गिळून गप्प बसावे लागत आहे. अमर उजाला मधील पत्रकारांची दयनीय अशी अवस्था असताना संपादक मात्र ऐशारामाचे जीवन जगत असल्याचे वृत्त आहे. अमर उजाला मधील पत्रकारां प्रमाणेच इतर वृत्तपत्रातील पत्रकारांचे सुद्धा हाल होत आहेत. मजिठीया आयोगाच्या शिफारसी नुसार पत्रकारांना वेतन आणि इतर सुविधा दिल्याचे सांगण्यात येत असलें तरी अश्या कोणत्याही सुविधा देण्यात येत नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.