Friday 26 June 2015

मुंबई मराठी पत्रकार संघात १०० टक्के परिवर्तन

शनिवारी २७ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक होत आहे. गेले काही दिवस पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत आहे. या प्रचारा दरम्यान कित्तेक आरोप प्रत्यारोप होता आहेत. सध्याचे अध्यक्ष देवदास मटाले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मला एक संधी द्या अशी विनवणी करत गेले ४ वर्षे पत्रकार संघाचे अध्यक्ष असणाऱ्या मटाले यांना पत्रकार संघासाठी निधी जमवता आला नसल्याने पत्रकार संघाच्या बँकेमधील ठेवी मोडून इमारत दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. पत्रकार संघाच्या इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि आपल्या मर्जीतील एका व्यक्तीला धर्मादाय संस्था असलेल्या पत्रकार संघात ४५ हजार रुपये पगार दिल्याचा आरोप मटाले यांच्यावर आहे. सध्या या ४५ हजाराच्या नोकराला आरोप झाल्याने काढले असल्याचे वृत्त आहे. सध्याचे अध्यक्ष असलेले मटाले यांची अशी प्रकरणे निवडणुकी मध्ये गाजत असतानाच या आधीही अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद मोकाशी, नरेंद्र वाबळे या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. माजी अध्यक्ष असलेल्या मोकाशी यांच्यावर तर स्वताचे प्यानल बनवताना दुसऱ्या प्यानलचे उमेदवार पळवल्याचा आरोप झाला आहे. अश्या पळवापळवी केलेल्या उमेदवारांनी आम्ही तुमचे उमेदवार नाहीत अशी तंबी मोकाशी यांना दिल्याने माजी अध्यक्ष मोकाशींना किती लोकांचा पाठींबा आहे जग जाहीर झाले आहे. 

एकीकडे माजी अध्यक्ष आपल्याला पुन्हा अध्यक्षपद मिळावे म्हणून आपले नशीब आजमावत असताना पत्रकार संघातील जेष्ठ अश्या सोमनाथ पाटील, अनिकेत जोशी, शशिकांत सांडभोर आणि सुधाकर कश्यप, विष्णू सोनावणे इत्यादी तरुण पत्रकारांनी एकत्र येवून परिवर्तन नावाचे प्यानल उभे केले आहे. या प्यानलचा प्रचार सर्वत्र चांगल झाला असून पत्रकार संघाच्या सदस्यांच्या मनामनात परिवर्तन करण्याचे वारे वाहू लागले आहेत. परिवर्तन प्यानलमध्ये सर्व उमेदवार वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्या मध्ये खरोखर घाम गाळून आपली रोजी रोटी कमावणारे असल्याने इतर प्यानल मधील रिकामटेकडे अराहून पत्रकार असल्याचे भासवणारे नाहीत हि जमेची बाजू ठरली आहे. गेल्या काही वर्षात पत्रकार संघातील सदस्य आणि सदस्य यांच्यामधील संपर्क तुटला होता. याला कारणीभूत काही पदाधिकारी असल्याने सदस्यांमध्ये नाराजी पसरली होती. हि नाराजी शनिवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याला कारणीभूत ठरणार आहे.