Wednesday, 4 June 2014

आमदाराने पत्रकाराची नोकरी घालविली

कधी पत्रकारांवर प्रत्यक्ष शारीरिक हल्ले करून,कधी धमक्या देऊन तर कधी पत्रकारांवर खंडणी मागितल्याचे किंवा विनयभंगाचे खोटे खटले दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो. पत्रकार ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या पत्राच्या व्यवस्थापनावर दबाव आणून किंवा व्यवस्थापनाला धमकावून पत्रकारांना आयुष्यातून उठविण्याच्या घटना महाराष्ट्रात अनेक घडलेल्या आहेत.अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे.स्थानिक आमदाराच्या विरोधात बातमी देणे हिंदुस्थानचे पत्रकार अनिल ओझा यांना महागात पडले आहे.

Tuesday, 3 June 2014

सत्यकथा' मासिकाचे संपादक राम पटवर्धन कालवश


patwardhan

मौज प्रकाशनाचे संपादक राम पटवर्धन यांचे आज निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. 'मराठी साहित्यातील हेडमास्तर' अशी ख्याती असलेल्या पटवर्धन यांनी 'सत्यकथा' या मासिकाचे साक्षेपी संपादन केले होते. श्री. पु. भागवत यांच्या सोबतीने त्यांनी 'मौजे'मधून अनेक लेखक घडविले.

बेरक्या इफेक्ट - पालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाचा महामुणकर यांनी दिला राजीनामा


मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकारयाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्ष पदाचा सुजित महामुणकर यांनी राजीनामा दिला आहे. महामुणकर यांनी राजीनामा दिल्याने बिनकामाचा नामधारी अध्यक्ष गेल्याने खूप बरे वाटते आहे अशी प्रतिक्रिया वार्ताहर संघाच्या काही पदाधिकार्यांनी खाजगीमध्ये व्यक्त केली आहे. 

Monday, 2 June 2014

देशोन्नतीच्या कार्यालयावर भंडाऱ्यात हल्ला

भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.

पत्रकारांचे २५ जून रोजी कशेडी घाट रोको आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लगेच सुरू करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत असून याच मागणीसाठी येत्या २५ जून रोजी कशेडी घाटात रस्तारोको कऱण्याचा निर्णय रविवारी पेण येथे रायगड प्रेस क्लब आणि रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.