Tuesday 3 June 2014

बेरक्या इफेक्ट - पालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाचा महामुणकर यांनी दिला राजीनामा


मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकारयाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्ष पदाचा सुजित महामुणकर यांनी राजीनामा दिला आहे. महामुणकर यांनी राजीनामा दिल्याने बिनकामाचा नामधारी अध्यक्ष गेल्याने खूप बरे वाटते आहे अशी प्रतिक्रिया वार्ताहर संघाच्या काही पदाधिकार्यांनी खाजगीमध्ये व्यक्त केली आहे. 
मुंबई महानगर पालिकेमध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी "बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ" स्थापन केला आहे. गेले कित्तेक वर्षे हा वार्ताहर संघ कार्यरत असला तरी सामान्य पत्रकारांकडे दुर्लक्ष करत फक्त पदाधिकाऱ्यांचे भले करून घेण्यात पत्रकार संघाने धन्यता मानली आहे. पत्रकारांनी राजकीय नेत्यांना किवा प्रशासनाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून नाचवायचे असते परंतू पालिकेत मात्र जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर वार्ताहर संघ व पदाधिकारी नाचण्याचे काम करत आहे. वार्ताहर संघाच्या पदावर कोण असावे हे जनसंपर्क अधिकारी ठरवत असल्याची माहिती एका वार्ताहर संघाच्या पदाधिकार्याने दिली आहे. 

वार्ताहर संघाच्या अध्यक्ष पदी सुजित महामुणकर यांची २०१२ मध्ये वार्ताहर कक्षातील बंद खोलीत नेमणूक करण्यात आली होती. अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यावर २०१४ पर्यंत कार्यकारणीचा कार्यकाळ संपे पर्यंत महामुणकर क्वचितच पालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये आले होते. दोन वर्षाच्या कार्यकाळात महामुणकर यांनी पत्रकारांसाठी कोणतेही उपक्रम राबवलेले नाहीत काही कार्यकारिणी सदस्यांनी एखादा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केल्यास मी अध्यक्ष आहे मला विचारल्याशिवाय काहीही करू नका असे आदेश पदाधिकार्यांना दिल्याने कोणतेही उपक्रम वार्ताहर संघाने राबवलेले नाही. महामुणकर यांनी स्वतः काही केले नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा काही करू दिले नाही, यामुळे वार्ताहर संघाच्या विरोधात पत्रकारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे असे वार्ताहर संघाच्या एक वरिष्ठ अश्या पदाधिकार्याने बेरक्याला सांगितले आहे. 

महामुणकर व काही पदाधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे पालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा आणखी एक पत्रकार संघटना उभी राहिली आहे. या नवीन पत्रकार संघटनेने वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे कुठेही आमचा सत्कार करा, काही माहिती असेल तर फक्त आम्हालाच सांगा, आम्ही पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आहोत असे कुठेही न सांगता पत्रकारांच्या हिताच्या मागण्या पत्राद्वारे देण्यास सुरुवात केली आहे. पुनम पोळ या महिला पत्रकाराला मुंबई तरुण भारतने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर कामावरून काढले, तेव्हा नवीन पत्रकार संघटना पोळ यांच्या मागे उभी राहिली होती. या नवीन पत्रकार संघटनेने जनसंपर्क अधिकाऱ्याची झोप उडवून दिली होती. अश्यावेळी वार्ताहर संघाच्या पदाधिकारी आणि महामुणकर यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. 

आपण केलेल्या कारनाम्यामुळे पत्रकाराची नोकरी गेल्याने नवीन संघटना आपली वाट लावत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याच्या लक्षात येताच वार्ताहर संघाचे अध्यक्ष महामुणकर आणि काही पदाधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक जनसंपर्क अधिकाऱ्याबरोबर झाली होती. या बैठकीत नवीन पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांना टार्गेट करून धमक्या देण्याचे ठरवण्यात आले होते. तश्या धमक्या देण्याचा प्रयत्न अध्यक्ष सुजित महामुणकर आणि "नवभारत"चे पत्रकार अखिलेश मिश्रा यांनी केला होता, परंतू नवीन संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या महिला पत्रकाराच्या संपादकांनी या दोघांनाही उलट सुनावल्याने महामुणकर आणि मिश्रा यांचा चांगलाच पचका झाला होता. 

स्वताच्या डोक्याने चालायच्या ऐवजी पालिकेच्या अर्धवट शिकलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नादाला लागून धमक्या देण्याचा प्रकार महामुणकर यांनी केला असल्याचे बेरक्याने (http://berakya.blogspot.in/2014/05/blog-post_7910.html#more) उघड केला होता. यामुळे महामुणकर यांची प्रतिमा पालिका व पत्रकारिता क्षेत्रात चांगलीच डागाळली आहे. महामुणकर यांना सर्वत्र तोंड लपवून फिरायची वेळ आली आहे. पालिका पत्रकार कक्षामध्ये सुद्धा महामुणकर यांना आपली मान खाली घालून फिरावे लागत असल्याने महामुणकर यांना आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशी परिस्थिती असताना महामुणकर यांनी मात्र २ जूनला संध्याकाळी आपल्या कार्यकारिणीला मी कार्यकारिणीची वेळ संपल्याचे कारण पुढे करत राजीनामा देतो असे सांगत राजीनामा दिला आहे.