Sunday, 10 August 2014

महेश म्हात्रे यांची आयबीएन - लोकमतच्या डेप्युटी चिफ एडिटर पदी नियुक्ती

आयबीएन रिलायंस समूहाच्या अंबानी यांनी विकत घेतल्यावर आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक निखील वागळे यांनी राजीनामा दिला होता. वागळे यांच्या राजीनाम्यानंतर आयबीएन लोकमतचे संपादक पद रिक्त होते. आता मुख्य संपादक हे पद रिक्त ठेवून त्या ऐवजी दोन डेप्युटी चिफ एडिटर अशी दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यापैकी एक पदावर दैनिक प्रहारचे संपादक महेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. 


शेतकरी मासिक खासगी स्टॉल्सवरही मिळणार

शेतकऱ्यांच्या हितार्थ प्रकाशित करण्यात येणारे ‘शेतकरी मासिक’ आता खासगी स्टॉल्सवरही उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या निर्णयास शासनाने मान्यता दिली असून अंकांच्या किंमतीतही 15 रुपयांवरुन 25 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. 

Saturday, 9 August 2014

५ भुरट्या पत्रकारांना खंडणी वसुल करताना पकडले

 उत्तर प्रदेश शाहजहांपुर - पत्रकारितेला बदनाम करणाऱ्या ५ भुरट्या पत्रकारांना कोतवाली पोलिसांनी महामार्गावर प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुल करताना पकडले आहे. प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यावर पत्रकारांना दंड बसवण्यात आला आहे. अजीजगंज पोलिस ठाण्याच्या वि के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले कित्तेक महिने टोल ट्याक्स केंद्राजवळील भुरट्या पत्रकाराकडून वसुली केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापाळा रचून या ५ जणांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

पत्रकारांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

अमृतसर येथे शिख समुदायावर झालेल्या लाठीचार्जचे वृत्तसंकलन करायला गेलेल्या पत्रकारांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्ज विरोधात चंदिगढ पंजाब जर्नलिस्ट एसोसिएशन द्वारे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हरयाणा सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. धर्म सिंग मार्केट येथून निघालेला मोर्चा हॉल गेट येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचा पुतळा जाळण्यात आला. भारतात आज पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारंवर ओलिस लाठीचार्ज करत आहेत या प्रकारांची चौकशी करून पत्रकारांना नुकसान भरपाई मिळावी तसेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार गुरमिंदर सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. 

Thursday, 7 August 2014

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमिक शृंखला 'चाचा चौधरी'तील चाचा व साबू या व्यक्तिरेखांच्या चित्रांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गुरगावमधील मेदांता रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते.