Saturday 9 August 2014

५ भुरट्या पत्रकारांना खंडणी वसुल करताना पकडले

 उत्तर प्रदेश शाहजहांपुर - पत्रकारितेला बदनाम करणाऱ्या ५ भुरट्या पत्रकारांना कोतवाली पोलिसांनी महामार्गावर प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुल करताना पकडले आहे. प्राण्यांच्या व्यापाऱ्यांकडून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यावर पत्रकारांना दंड बसवण्यात आला आहे. अजीजगंज पोलिस ठाण्याच्या वि के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले कित्तेक महिने टोल ट्याक्स केंद्राजवळील भुरट्या पत्रकाराकडून वसुली केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापाळा रचून या ५ जणांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

सकाळी पोलिसांनी रफी अहमेद यांच्या तक्रारीवर चौकशी करताना प्रश्न विचारले असता त्याने आपल्या जवळ च्यानलचे ओळखपत्र  दाखवून आपला रुबाब झाडण्याचा प्रयत्न केला. तसेच हे ओळखपत्र घेवून पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसानी तपास करून रामासरे, अरविंद, वीरेश, कुलदीप व नरेश यांना अटक केली आहे. पोलिसांना यांनी आपण हफ्ते गोळा करत असल्याचे कबुल केले आहे. त्यांनी आपल्या म्होरक्याचे नाव सांगितले असून आपण १५ हजार रुपये भरून पत्रकार बनलो असल्याचे सांगितले. बहुतेक ठिकाणी भुरटे पत्रकार आणी पोलिसांची मिली भगत असल्याने महामार्गावर वाहन चालकांकडून वसुली केली जात नसल्याचे.