Sunday 10 August 2014

शेतकरी मासिक खासगी स्टॉल्सवरही मिळणार

शेतकऱ्यांच्या हितार्थ प्रकाशित करण्यात येणारे ‘शेतकरी मासिक’ आता खासगी स्टॉल्सवरही उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या निर्णयास शासनाने मान्यता दिली असून अंकांच्या किंमतीतही 15 रुपयांवरुन 25 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. 


शेतकरी मासिकाच्या अंक छपाईबाबत निविदा धारकांशी आवश्यक तो करारनामा करण्यास आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 2 ऑगस्ट, 2014 पासून शेतकरी मासिकाची वार्षिक वर्गणी 150 रुपयांवरुन 250 रुपये आणि द्विवार्षिक वर्गणी 250 रुपयांवरुन 500 रुपये करण्यात आली आहे.