Saturday 22 March 2014

रोबो जर्नालिझमची सुरुवात


LAT Quakebot
अगोदर प्रिंट जर्नालिझम, नंतर इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम, वेब जार्नालिझम आणि आता रोबो जर्नालिझमची सुरुवात होत आहे. म्हणजे बातम्या लिहिण्यासाठी आता मनुष्य पत्रकाराची गरज असणार नाही तर हे काम रोबो करणार आहे. अमेरिकेतील "द लॉस एजिल्स टाइम्स" या वृत्तपत्राने रोबो जर्नालिझमला सुरूवात केली आहे. या दैनिकाने रोबो पत्रकाराची कामं करणारा प्रोग्राम तयार केला आहे. 


केन श्वेन्के तयार केलेल्या या प्रोग्रामचा प्रयोग केला गेला. तो यशस्वी झाला.भूकंप आल्यानंतर रोबो पत्रकार काही मिनिटात भूकंपावर एक लेख लिहून तयार करणार आहे.टाइम्सच्या रोबोने पहिली बातमी भूकंपाचीच दिली आहे.रोबोला सूचना दिल्यानंतर केवळ तीन मिनिटात रोबोने बातमी तयार करून ती वेबसाईठवर पोस्ट केली.अर्थात हा रोबो केवळ भूकंपाच्याच बातम्या देईल असे नाही तर खेळ,गुन्हेगारी विश्वाच्या बातम्याही तो देणार असून अन्य दैनिकात त्यादृष्टीने प्रयोग सुरू आहेत.

रोबोट पत्रकारावरून पाश्चात्य देशातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.रोबो पत्रकार भविष्यात आपली जागा तर घेणार नाही ना या आशंकेने सारे पत्रकार अस्वस्थ झाले आहेत.ही व्यवस्था आपल्याकडे यायलाही आता फार वेळ लागणार नाही.अर्थात रोबो माहिती संकलीत करून ती एकत्र कऱून बातमी तयार कऱणार असल्याने त्यात मानुसकीचा ओलावा असणार नाही असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.भूकंप असेल,गारपीट असेल किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या देताना नुसतीच आकडेवारी उपयोगाची नसते त्यात त्या बातमीला मानवेतचा गंधही असला पाहिजे.