Friday 4 April 2014

जय महाराष्ट्रच्या कॅमेरामनवर हल्ला


dilip rai-2

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणाचा मोठा तडाखा आज मिडियालाच बसला.जय महाराष्ट्र या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट दिलीप राय दंगलीची कव्हरेज करीत असताना त्यांनाच मारहाण करण्यात आली.त्यात ते जखमी झाले आहेत. शुक्रवारी निवडणूक आयुक्तांना निवेदन देवून आरोपीवर कडक कारवाही करण्याची मागणी केली जाणार असल्याचे विविध पत्रकार संघटनांनी सांगितले आहे. 



गुरुवारी मनसेचे आदित्य शिरोडकर आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते. गेले काही दिवस मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. या आरोप प्रत्यारोपामुळे मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. या दंगलीचे छायाचित्रण करणाऱ्या जय महाराष्ट्र वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट दिलीप राय यांच्या डोक्याला मार लागला आहे. या घडल्या प्रकारची पत्रकारामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.