Tuesday 15 July 2014

पत्रकार वैदिक - हफीज भेटीवरून राज्यसभा दोनदा तहकूब



योगगुरू रामदेव बाबा यांचे निकटवर्तीय व भाजपशी जवळीक असलेल्या एका मुक्त पत्रकाराने २६-११ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफीज सईद याची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने आज (सोमवारी) राज्यसभेमध्ये गदारोळ केल्याने प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. 
या भेटीशी आपला काहीही संबंध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी, भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवादी सईदला भेटण्यामागील उद्देश सरकारने सविस्तर निवेदनाद्वारे स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे. हा राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून, त्या पत्रकाराला अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. या भेटीला सरकारची मान्यता होती काय हे सभागृहनेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट करावे, असा मुद्दा दिग्विजयसिंग यांनी उपस्थित केला. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी दिग्विजयसिंग यांना हा मुद्दा मांडण्यास मज्जाव केला. हा मुद्दा मांडण्याची ही वेळ नसल्याचे सांगून त्यांनी प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरवात केली.