Tuesday 15 July 2014

दूरदर्शनसाठी पत्रकार हवेत

भारत सरकारच्या प्रसार भारती द्वारे चालवण्यात येणाऱ्या दूरदर्शनसाठी काही रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या रिक्त जागांसाठी २१ जुलै पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे मास कम्युनिकेशन / पीजी डिप्लोमा या पैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच या कामाचा दोन वर्षाचा अनुभव अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे. या संदर्भातील अधिक माहिती किवा अर्ज ddinews.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी - दूरदर्शन न्यूज, ४१६, टॉवर बी, ४ था मजला, दूरदर्शन भवन, कॉपरनिकस मार्ग, नवी दिल्ली - ११०००१.