Sunday 20 April 2014

जियो वृत्तवाहिनीचे संपादक हमीद मीर यांच्यावर गोळीबार

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला. जियो वृत्तवाहिनीचे संपादक असणारे मीर कार्यालयात जात असताना काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात हमीद मीर यांच्या शरीराच्या खालच्या भागात दोन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. 

सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पाकिस्तानमधील एक निर्भिड पत्रकार म्हणून हमीद मीर प्रसिद्ध होते. पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर हे पाकिस्तानबाहेर फारसे कुणाला परिचित नसतील; पण' जिओ टीव्ही' या चित्रवाणीवरील 'कॅपिटल टॉक' या कार्यक्रमाचे संचालक म्हणून आणि इंग्रजी, उर्दू , हिंदी आणि बंगाली भाषांतील स्तंभलेखक म्हणूनही ते पाकिस्तानात नुसते प्रसिद्धच नाहीत , तर त्यांच्याभोवती एखाद्या चित्रपट नायकाप्रमाणे प्रसिद्धीचे वलय आहे. पाकिस्तानी सरकारच्या अनेक निर्णयांना ठामपणे विरोध दर्शविल्यामुळेसुद्धा हमीद मीर चर्चेत होते.