Thursday 1 May 2014

जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी "मुंबई महानगपालिका पत्रकार संघाची" स्थापना

मुंबई महानगर पालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांमध्ये होणारा भेदभाव, पलिकेकडून व पालिकेच्या अंगीकृत असलेल्या बेस्ट प्रशासनाकडून पत्रकाराना मिळणाऱ्या सोईं सुवीधा प्रत्तेक पत्रकारला मिळाव्यात, यासाठी जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी " मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.  "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " " जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र " या पत्रकारांच्या यूनियनला सलग्न राहून पालिका आणि बेस्टमध्ये काम करणार आहे.

"मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्या सन २०१४ - २०१५च्या कार्यकारणीवर अध्यक्षपदी राधिका यादव (दैनिक "पूर्णविराम" ) सेक्रेटरीपदी अजेयकुमार जाधव (दैनिक "जनतेचा महानायक") खजिनदारपदी सुजाता ठाकूर (दैनिक "खबरे आज तक") कार्यकारणी सदस्य म्हणून योगेश जंगम (दैनिक "नवाकाळ"), काशिनाथ महादे (दैनिक "नवशक्ती"), पुनम पोळ (दैनिक "मुंबई तरुण भारत"), प्रथम गायकवाड (दैनिक "वृत्तरत्न सम्राट") यांची तर सल्लागार म्हणून नारायण पांचाळ (दैनिक "सागर") जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई महानगर पालिकेतील पत्रकार म्हणून अनुभव घेतलेल्या पत्रकारांनी नवीन पत्रकार संघ स्थापन झाल्याबाबत आनंद व्यक्त केला असून पत्रकार संघाला सुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातील पत्रकाराप्रमाणे पालिकेमधील पत्रकारानाही सुविधा मिळवून देण्यासाठी "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " या संघटनेला पाठींबा देण्याचे आश्वासन विविध पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी दिले आहे. 
वेबसाईट - http://bmcpress.blogspot.in