Saturday 7 June 2014

जिओ न्यूजला टाळे

GeoNews
पाकिस्तानात माध्यम स्वातंत्र्याची सर्रास होळी पेटविली जात आहे.पत्रकारांवर हल्ले करून त्यांचा जीव घेणे ही नित्याची बाब झाली आहे.त्यातून अपेक्षित हेतू साध्य होत नसल्याने आता माध्यमांचे आवाज बंद कऱण्यासाठी त्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू झाले आहे.

पाकिस्तानात 'जिओ न्यूज' या न्यूज चॅनेलचा परवाना १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेची बदनामी केल्याचा आरोप या चॅनेलवर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीचे (PEMRA) अध्यक्ष परवेज राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिओ न्यूजने PEMRA च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १५ दिवसांसाठी त्यांचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे अथॉरिटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिवाय जिओ न्यूजवर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आले आहे. जिओ न्यूजने ही रक्कम १५ दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. दंड न भरल्यास जिओ न्यूजचा परवाना रद्द करण्यात येईल. 

मध्यंतरी जिओ न्यूज चे पत्रकार हमिद मीर यांचयार जीवघेणा हल्ला झाला होता.त्यातून तो बचावला.हा हल्ला आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि तिचा प्रमुख लेफ्ठनंट जनरल जहिरूल इस्लाम यांनी घडवून आणल्याचा आरोप ज़िओ न्यूजने केला होता.त्यामुळे आय एस आय आणि जिओ टीव्ही यांच्यात वाद सुरू झाला होता. भारतात राहून पाकिस्ताचा पुळका करणारे अनेक पत्रकार मुंबईत आणि आपल्या देशात आहेत.मात्र तेथे सरळ सरळ माध्यमांची मुस्कटदाबी सुरू असतानाही कोणी त्याचा निषेध करायलाही तयार नाही हे विशेष. 
http://www.batmidar.in/2014/06/06/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-15-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F/