Friday 18 July 2014

स्थायी समिती अध्यक्षांनी दिला पत्रकारांना दम

मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी पत्रकारांना मी सांगेन तेवढेच लिहा असा सज्जड दम दिला असल्याने पालिकेतील काही पाकीट बहाद्दर पत्रकारांनी चूप बसण्यात आपले भले मानले असताना स्वाभिमानी पत्रकारांमध्ये मात्र संतापाची लाट पसरली आहे.

मुंबई मध्ये सध्या पाऊस पडत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुंबई मध्ये पाणी कपात लागू आहे. यामुळे पालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी शिवसेनेचे शैलेश उर्फ यशोधर फणसे यांची नेमणूक केली आहे. गुरुवारी पालिकेचे वृत्तसंकलन करणारे पत्रकार फणसे यांच्याकडे खड्डे आणि पाण्याबाबत माहिती घेण्यास गेले होते. 

पत्रकारांना माहिती मिळावी आणि आपले नाव सतत चर्चेत राहावे म्हणून कित्तेक पुढारी प्रयत्न करत असतात. परंतू फणसे यांनी पत्रकारांना भेटण्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५ या अर्ध्या तासात येवूनच भेटावे असा नियम केला आहे. फणसे यांनी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पत्रकार आले असतानाही फणसे आपल्या कार्यालयातील आतील चेंबर मध्ये मिटिंग मध्ये व्यस्त होते. 

पत्रकारांना तासभर आपल्या कार्यालयात बसवून ठेवल्या नंतर फणसे पत्रकारांना सामोरे गेले पत्रकारांनी खड्डे आणि पाण्याचा विषय काढताच फणसे पत्रकारांवर भडकले आणि मलाच अधिकारी माहिती देत नाहीत. तुम्हाला पाणी आणि खड्ड्याशिवाय काही सुचत नाही काय, मी जी माहिती देतो आहे तेवढेच छापा असा दमच फणसे यांनी पत्रकारांना दिला. 

पत्रकारांना दम दिल्यावर पालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये स्थायी समिती अध्यक्षा विरोधात संतापाची लाट पसरली, काही पत्रकारांनी फणसे यांना बरे वाईट बोलून आपला राग शांत करून घेतला तर स्थायी समिती अध्यक्षांकडून काही पत्रकारांना पाकिटे वाटली जात असल्याने गप्प बसण्यात त्यांनी आपले भले मानले. परंतू स्वाभिमानी पत्रकारांमध्ये मात्र संतापाची लाट पसरली आहे. अश्या स्वाभिमानी पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रात फणसे यांनी पत्रकारांना दम दिल्याच्या बातम्या प्रसिध्द केल्या बाकीच्यांनी मात्र मिळणारे पाकिट मिळण्यासाठी गप्प बसण्यात भले मानले आहे.