Tuesday 15 July 2014

सलमान खानवर छायाचित्रकारांचा बहिष्कार

अभिनेता सलमान खान याच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मुंबई मधील छायाचित्रकारांनी घेतला आहे. शुक्रवारी त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांबरोबर अरेरावी केली होती. या प्रकारामुळे सलमान खान याने माफी मागावी अन्यथा २५ जुलैला त्याच्या प्रसिद्ध होणाऱ्या "किक" या चित्रपटाच्या उद्घाटनावेळी एकही फोटो काढणार नाही असा निर्णय छायाचित्रकार संघटनांनी घेतला आहे.