Tuesday 15 July 2014

काश्मीरबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पत्रकार वैदिक यांची पलटी

काश्मीरला स्वतंत्र करण्यास हरकत नाही असं वादग्रस्त वादग्रस्त विधान करून वादात सापडलेल्या पत्रकार वैदिक यांनी या वक्तव्यावरून आता घूमजाव केलं आहे. आपण फक्त काश्मीरी लोकांच्या हिताची बाजू मांडली आणि स्वायत्त राज्याच्या निर्मितीचं मत व्यक्त केलं होतं. 

काश्मीर भारतापासून वेगळा करावा असं मत आपलं नसल्याचा दावा वैदिक यांनी केला आहे. ते आज दिल्लीमध्ये वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक पाहता 26-11 हल्ल्याचा मुख्य आरोपी हाफिज सईद याची भेट घेतलेले वैदिक हे या आधीच टीकेचं लक्ष बनले होते.

मात्र 29 जून रोजी डॉन या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत वैदिक यांनी आपण स्वतंत्र काश्मीरच्या बाजूनं असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी दोन्ही देशांनी विशेषतः भारतानं मन मोठं करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या विधानावरून गदारोळ माजताच वैदिक यांनी आता घूमजाव केलं आहे.

दरम्यान वैद प्रताप वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माणूस आहेत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हे विधान करून राहुल यांनी वैदिक यांच्या पाकिस्तानातल्या वादग्रस्त भेटीशी आणि वक्तव्यांशी संघाला जोडण्याचा प्रयत्न केला.  
(एबीपी माझा मधून साभार)