Tuesday 15 July 2014

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष

महाराष्ट्र शासनाच्या यादीवरील सर्वच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्ट बस पास द्यावा असा प्रस्ताव बेस्ट उपक्रमाने मंजूर केला आहे. परंतू जे काही मिळावे ते आपल्याला इतर सगळे गेले झक मारत असे वागणाऱ्या विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाच्या स्वार्थी पदाधिकाऱ्यानी स्वताला आणि आपल्या काही खास सभासदांना बेस्ट बस पास मिळवून घेतले आहेत. इतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार बस पास साठी या स्वार्थी पत्रकारांकडे गेल्यावर हे स्वार्थी पत्रकार हात वर करत असल्याने नियमाप्रमाणे सर्वांनाच बस पास मिळत नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मंत्रालयातील या स्वता पुरता विचार करणाऱ्या स्वार्थी पत्रकारांना राज्य सरकारच्या एसटीचा प्रवास मोफत आहे. रेल्वेमध्ये अर्ध्या तिकीटची सेवा मिळत आहे. तरीही बेस्टचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना बेस्ट बसचा पास मिळाला मग आपल्यालाही तसा पास मिळाला पाहिजे अशी या पत्रकारांची इच्छा गेले कित्तेक वर्षे होती. बस पास पाहिजे म्हणून मंत्रालयातील पत्रकारांच्या वार्ताहर संघाने तसा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आणि सर्वच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. 

बेस्टने महाराष्ट्र शासनाच्या यादीवरील सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्ट बस पास देण्याचा नियम केला. आता या नियमाप्रमाणे अंदाजे ४५० ते ५०० अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास मिळायला हवे होते. परंतू पत्रकारांना देण्यात येणाऱ्या बजेटच्या ब्यागा पळवणाऱ्या आणि दिवाळी मध्ये मंत्र्यांकडून पाकीट गोळा करण्या पुरता मर्यादित असलेल्या तसेच नोंदणीकृत नसलेल्या, बेकायदेशीर पणे चालवण्यात येणाऱ्या विधिमंडळ मंत्रालय वार्ताहर संघाच्या स्वार्थी पदाधिकारयांनी स्वतापुर्ता आणि आपल्या काही खास सभासदांना तेवढे पास मिळवून दिलेले आहेत. विधिमंडळ मंत्रालय वार्ताहर संघ हि संघटनाच मुळात नोंदणीकृत नाही हि संघटना काही स्वार्थी पत्रकारांच्या हितासाठी चालवली जात आहे. बस पास या स्वार्थी संघटनेचे पदाधिकारी आपल्या स्वताच्या खिश्यातून किवा आपल्या घरातून देत नाहीत याची नोंद घेण्याची गरज आहे. 

स्वतापुरता विचार करणाऱ्या अश्या स्वार्थी पत्रकारांमुळे आज कित्तेक गरजू पत्रकारांना बस पास मिळालेले नाहीत. आम्ही पत्रकार सर्वाना न्याय मिळवून देतो म्हणवणारे मंत्रालयातील बोगस संस्था चालवणारे वार्ताहर संघाचे पदाधिकारीच शासनाने अधिस्वीकृतीधारक दिलेल्या इतर पत्रकारांवर अन्याय करत आहेत. बेस्ट आणि माहिती व जनसंपर्क संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी अश्या बोगस व नोंदणीकृत नसलेल्या वार्ताहर संघाने जो काही प्रकार केला आहे त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. बेस्टने केलेल्या नियमाप्रमाणे सर्वच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्ट बस पास देवून स्वार्थी पत्रकार आणि त्यांच्या संघटनेला चपराक हाणण्याची गरज आहे.

दरम्यान मंत्रालयात अश्या प्रकारे स्वार्थी पत्रकारांनी विधिमंडळ मंत्रालय वार्ताहर संघावर कब्जा मिळवून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा धंदा चालवला आहे. यामुळे अन्याय झालेल्या पत्रकारानी कामगार कायद्याखाली नोंद झालेल्या जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेशी संपर्क केला आहे. स्वार्थी पत्रकारांच्या कामाच्या पद्धतीला कंटाळलेल्या पत्रकारांनी युनियनने विधिमंडळ व मंत्रालायामध्ये आपले युनिट स्थापन करून पत्रकारांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे. युनियनच्या काही पदाधिकार्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रालय व विधिमंडळात आपले एक युनिट चालू करण्याला सुरुवात केली आहे. कामगार कायद्यानुसार नोंद असलेली युनियन आता मंत्रालय आणि विधिमंडळामध्ये पत्रकारांसाठी काम करणार असल्याने आता लवकरच बोगस व नोंदणीकृत नसलेल्या वार्ताहर संघाला तले लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.