Friday 11 July 2014

मिडियाकडून सरकारची चाटूगिरी

लोकसभेमध्ये महागाईवर चर्चा सुरु असताना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झोप आली म्हणून इलेक्ट्रोनिक मिडीयावर दिवसभर तसेच दुसऱ्या दिवशी प्रिंट मिडिया मध्ये तसे फोटो आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याच्याच दुसऱ्या दिवशी बजेट सादर झाले त्या दिवशी स्मृती इराणी व इतर मंत्रीही झोपा काढत होते. परंतू राहुल गांधींची बातमी प्रसारित करणाऱ्या मिडियाने सत्ताधारी झोपले असताना तश्या बातम्याच प्रसारित केलेल्या दिसत नाही. यामुळे मिडिया मोदींच्या सरकारची चाटूगिरी करत असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर वर होत आहे.


राहुल गांधीनी जी चूक केली तीच चूक स्मृती इराणी व इतर मंत्र्यांनी सुद्धा केली मग मिडियाने ती बातमी का दाखवली नाही असा प्रश्न सोशल मिडिया मधून विचारला जात आहे. मोदींना प्रधानमंत्री बनवण्यामध्ये मिडियाचा मोठा रोल आहे. मिडियाला जाहिराती म्हणून लाखो करोडो रुपये मिळाले त्या बदल्यात मोदींच्या जाहिराती आणि बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. आता मोदींचे सरकार आले आहे. यामुळे आजही निवडणुकीच्या काळात मिळालेल्या जाहिराती आणि पेड न्यूज बदल्यात आजही मोदींच्या सरकारची चाटू गिरी केली जात आहे असा आरोप मिडीयावर खुलेआम होऊ लागला आहे.

मिडियाला जाहिराती हव्या असतात त्या जाहिरातींवर मिडिया चालतो हे खरे असले तरी मोदींच्या टीमने कितीही चुका केल्या तरी मुग गिळून गप्प बसायचे आणि तीच चूक विरोधकांनी केली कि त्याची मात्र सुपारी घेताल्यासारखी बातमी प्रसिध्द करून त्याला बदनाम करायचे असा प्रकार केला जात आहे. पत्रकार आणि मिडीयाने सरकारच्या चांगल्या बातम्यांना नक्की प्रसिद्धी दिली पाहिजे पण त्याच बरोबर सरकारच्या चुका सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे, परंतू असे होताना दिसत नाही. यामुळे मिडीया सरकारला का भितो आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिडीयाने असे प्रकार वेळीच थांबावायची गरज आहे अन्यथा मीडियाची विश्वासअर्हता संपून जाईल वेळ लागणार नाही.